मध्यरात्री ‘गर्ल्स हॉस्टेल’मध्ये घुसून कापत असत मुलींचे ‘अंडरगारमेंट’, कसा लागला हाती जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यरात्रीनंतर झोपी गेलेल्या मुलींच्या खोलीत शिरकाव करुन त्यांच्या अंडरगारमेंट कापणाऱ्या एका माथेफिरूला शुक्रवारी रात्री महेश बाग कॉलनीत राहणाऱ्या दोन लोकांनी पकडले. एका महिन्यात या माथेफिरूने आठपेक्षा जास्त कॉलनींमध्ये असा प्रकार केला आहे. तो फक्त एकट्या असलेल्या मुलीलाच लक्ष्य करीत असे. त्या बदमाश्याने त्या भागात गार्ड म्हणून काम केले आहे, त्यामुळे मुलींची वसतिगृहे कोठे आहेत आणि एकाकी मुली कुठे राहतात हे त्याला ठाऊक होते.

डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत

टीआय तहजीब काझी यांच्यानुसार, या माथेफिरूचे नाव श्रीकांत चतुर्वेदी आहे आणि तो सतनाच्या खमरिया गावचा रहिवासी आहे. इंदूरमधील धन ट्रायडंट बिल्डिंगमध्ये तो एक गार्ड असून तो तेथेच राहतो. शुक्रवारी रात्री 3 वाजता महेश बागेत राहणारे चालक रोशन भिलवारे आणि शेजारी संजय खरे यांनी त्याला पकडले. यापूर्वी त्याच्यावर डझनहून अधिक गुन्हे दाखल झाले होते. 2019 मध्ये देखील आरोपीने मुलींच्या वसतिगृहात मुलींचे कपडे कापले होते.

आरोपीला पाहून मुलगी किंचाळली

बदमाश शितल नगर, सुमन नगर, स्वर्ण बाग कॉलनी, रवी जागृती नगर, महेश बाग कॉलनी, गुरु नगरसह आठ कॉलनींमध्ये असे काम करून चुकला आहे. चार घटनांमध्ये तर घटनेच्या वेळी मुली जाग्या झाल्या होत्या, ज्यांनी त्याचा फोटो पाहून त्याला ओळखले. 17 जून रोजी देखील एका खोलीत प्रवेश केला तेव्हा 15 वर्षीय मुलगी झोपेतून जागी झाल्यामुळे त्याने पळ काढला होता. पोलिस ठाण्यात आरोपी दिसताच मुलगी किंचाळली होती.

कात्री लावून सांगितले होते की ठार मारेन

एक दिवस अगोदर रवी जागृती नगर येथे राहणाऱ्या यशवंत मेवाडा यांच्या घरात घुसला होता. यशवंतची आई रामदेवी यांनी सांगितले की रात्री 3 वाजता मोबाईल पडल्याच्या आवाजामुळे झोपेतून जाग आली. पण कोणीही दिसले नाही म्हणून पुन्हा झोपले. त्यानंतर पुन्हा 3.45 वाजता पाहिले तर बदमाश त्यांच्या पायाजवळ उभा होता. वृद्ध महिला किंचाळली असता तिच्या गळ्यावर कात्री लावली आणि म्हणाला की किंचाळली तर जीव घेईन.