फायद्याची गोष्ट ! संपुर्ण कुटूंबाला मिळू शकतं ‘पेन्शन’, Family Pension चा ‘लाभ’ घेण्यासाठी जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंपन्यांमध्ये आणि संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (EPFO), पीएफ (PF) आणि पेन्शन स्कीम चालवली जाते. कर्मचारी दर महिन्याला आपल्या वेतनातून काही हिस्सा पीएफमध्ये जमा करतात आणि कंपनी देखील तेवढीच रक्कम पीएफ खात्यात जमा करते. कंपनी जो हिस्सा पीएफमध्ये जमा करते त्यातील काही हिस्सा एम्‍प्‍लॉई पेन्शन स्कीममध्ये (EPS) जातो. याद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. ईपीएस पेन्शनचा फायदा फक्त कर्मचाऱ्यांना नाही तर त्यांच्या कुटूंबाला देखील मिळतो. जर कोणत्याही ईपीएफ मेंबरचा मृत्यू झाला तर त्याचे कुटूंब म्हणजेच त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शनचा फायदा मिळेल. याला फॅमिली पेन्शन देखील म्हणतात.

केव्हा मिळते पेन्शन –
पेन्शनचा फायदा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी किमान 10 वर्ष कायम नोकरी केलेली असावी. या पेन्शन स्कीममध्ये फक्त कंपनीचे योगदान असते. या पीएफमध्ये कंपनीद्वारे करण्यात आलेल्या 12 टक्के योगदानाचा 8.33 टक्के हिस्सा असतो. पेन्शनमध्ये सरकार देखील योगदान देते, जे बेसिक सॅलरीच्या 1.16 टक्केपेक्षा जास्त असते. ईपीएफ सदस्य निवृत्तीशिवाय पूर्णता डिसेबल झाल्यानंतर पेन्शनवर दावा करु शकतील.

ईपीएफने फॅमिली पेन्शनसाठी 10 वर्षाची सेवा अनिवार्य ठेवलेली नाही. जर 10 वर्ष पूर्ण झाल्यावर जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटूंबाला पेन्शनचा फायदा मिळेल. कर्मचारी तेव्हाच पेन्शनवर दावा करु शकतील जेव्हा ते 10 वर्ष नोकरी करतील, ही पेन्शन फॅमिली पेन्शन अंतर्गत येईल.

कोणाला मिळेल फॅमिली पेन्शन –
1. ईपीएस स्कीममध्ये सदस्याच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या पत्नीला किंवा पतीला पेन्शन मिळेल.
2. जर कर्मचाऱ्यांना मुले असतील तर त्यांच्या 2 मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत पेन्शन मिळेल.
3. जर कर्मचारी विवाहित असेल तर त्याच्या नॉमिनीला पेन्शन मिळेल.
4. जर कोणी नॉमिनी नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडीलांना पेन्शन मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा –