फरहान अख्तरने शेअर केले गर्लफ्रेंड शिबानी सोबतचे फोटो, चाहत्यांची मिळतेय विशेष पसंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचं रिलेशनशिप कोणापासूनच लपून नाही. हे दोघेही पार्टी, इव्हेंट्स आणि व्हॅकेशनला जात असतात. सोशल मीडियावरही हे दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. नुकतीच फरहानने शिबानीचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिबानी सोबत तिचा पेट डॉगही दिसत आहे. चाहत्यांना या दोघांचेही फोटो विशेष आवडताना दिसत आहे.

View this post on Instagram

❤️❤️ @shibanidandekar #jimstagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

तुम्हाला सांगू इच्छितो हे दोघेही एकमेकांचे फोटो सोशलवर चाहत्यांना शेअर करत असतात.

फरहान आणि शिबानीच्या सोशल अकाऊंटवर चाहत्यांची नेहमीच नजर असते. त्यांनी फोटो शेअर करायचा उशीर असतो की, चाहत्यांमध्ये त्यांचे फोटो व्हायरल होताना दिसत असतात.

काही दिवसांपूर्वीच फरहान आणि शिबानी यांचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. त्यांचे हे फोटो देखील चाहत्यांना विशेष आवडले होते. त्यात शिबानी बिकीनी घातलेल्या आऊटफिटमध्ये दिसत होती.

फरहानच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलायचे झाले तर तो द स्काय इज पिंक या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत प्रियंका चोपडा आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

You might also like