‘डायरेक्टर’ राज कपूर यांच्या मुलाचं 23 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तमिळ फिल्म डायरेक्टर राज कपूरचा मुलगा शारूक कपूर याचं 23 व्या वर्षी निधन झालं आहे. तीव्र सर्दी आणि अशक्तपणामुळे शारूकनं आपला जीव गमावल्याचं समजत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शारूक आपली आई शकीला कपूरसोबत तीर्थयात्रेसाठी मक्का येथे गेला होता. तिथेच त्यानं शेवटचा श्वास घेतल्याचं समजत आहे. डायरेक्टरच्या मुलाचं अचानक निधन झाल्यानं फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. काल रात्री त्याचं पार्थिव मक्क्याहून चेन्नईला आणलं गेलं.

https://www.instagram.com/p/B0vaagZDEdd/?utm_source=ig_embed

अलीकडेच शारूकनं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले होते. यामध्येच त्याचा मक्का येथील प्रवास होता. डायरेक्टर राज कपूर यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलानं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शोबिजच्या जगात पाऊल टाकावं. अ‍ॅक्ट्रेस खुशबू आणि डायरेक्टर सी सुंदर राज कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या जवळचे मानले जातात.

https://www.instagram.com/p/B75Q6TBDVj1/

फिल्म मेकर राज कपूर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी तमिळ सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक सीवी श्रीधर यांचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांना तमिळ सिनेमातील सोनेरी काळातील दिग्गजांपैकी एक म्हटलं जातं. राज कपूर यांनी तमिळ इंडस्ट्रीला अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही शो दिले आहेत ज्यासाठी त्यांना अनेक अवॉर्ड मिळाले आहेत.