‘कोरोना’मुळं दिल्लीतील दुकानदाराच्या मृत्यूचं पहिलं प्रकरण, ‘या’च दुकानातून सामान घेत होते ‘मरकज’चे जमाती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या निजामुद्दीन स्थित मरकजमध्ये कोरोनाची अनेक प्रकरण पॉझिटिव्ह समोर येत आहेत. या दरम्यान सोमवारी मरकजच्या जवळ 74 वर्षीय एका वृद्ध व्यक्तीचे चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे आता निजामुद्दीन वस्तीत भीतीचे सावट आहे कारण या वृद्ध व्यक्तीचे मरकज जवळ दुकान होते आणि दुकानात वस्तीतील लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत होते, त्यामुळे या वस्तीतील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांची देखील चाचणी केली जाईल.

वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता परिसरात खळबळ उडाली आहे. दिल्लीत आता दुकानदाराचा पहिला मृत्यू झाला आहे. वृद्धाचे मरकज पासून जवळपास 50 मीटर दूर अंतरावर घर आहे. ते त्यांच्या दुकानात स्वत: बसत होते. दुकानात बसत असल्याने या वृद्ध व्यक्तीच्या दुकानात अनेक लोक रोज खरेदीसाठी येत असतं. या वृद्धाकडे मरकजचे जमातीचे लोक देखील सामान खरेदीसाठी येत असतं. वृद्ध स्वत: देखील मरकजमध्ये सामान देण्यासाठी जात असे. आता पोलीस विभागासमोर मोठे आव्हान असे की त्या सर्व लोकांचा शोध कसे घेणार जे या वृद्धाच्या संपर्कात आले आहेत.

कुटूंबाच्या सर्व सदस्यांची चाचणी
आता या वृद्धाच्या कुटूंबातील सर्वाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांना तोपर्यंत क्वॉरेंटाइन ठेवले जाणार आहे. आता आरोग्य विभाग या परिसरातील हजारो लोकांना क्वॉरेंटाइन करण्याची तयारी करत आहेत जे या दुकानात सामान खरेदी करण्यासाठी जात होते. शंका व्यक्त केली जात आहे की तबलिगीच्या कटामुळे आता संपूर्ण परिसर कोरोनामुळे संक्रमत होऊ शकतो.

दुकानदाराच्या मृत्यूचे पहिले प्रकरणं
दिल्लीत वृद्ध दुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या दुकानात मरकजचे लोक आणि परिसरातील लोक सामान खरेदीसाठी जात होते. यामुळे आता आरोग्य विभागासाठी ही डोकेदुखी झाली आहे. कारण या दुकानातून ज्या लोकांना सामान खरेदी केले ते लोक फक्त निजामुद्दीनमध्येच नाही तर संपूर्ण दिल्लीत हजारो लोकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोरोनाची प्रकरण वाढण्याची शक्यता आहे.