9 देशांतून 5 प्रकारचे ‘कोरोना’ व्हायरस भारतात पोहचले, ‘जीनोम सिक्वेंसिंग’मधून मिळाले ‘हे’ परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जैव तंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) देशाच्या दहा राज्यात आढळलेल्या कोरोना व्हायरसचे जीनोम सिक्वेंसिंग करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, अखेर भारतात हा व्हायरस कसा व कुठून पोहचला. यातून समजले की, नऊ देशांतून आलेले पाच प्रकारचे कोविड-19 व्हायरस देशात आढळले. डीबीटी विभागाने एप्रिलमध्ये जीनोम सिक्वेंसिंग सुरू केले होते ते नुकतेच पूर्ण झाले.

यानुसार पाच प्रकारचे व्हायरस आढळले आहेत. त्यांचे 19ए, 19बी, 20ए, 20बी आणि 20सी अशा प्रकारे वर्गीकरण केले आहे. यापैकी 19ए आणि बी व्हायरस चीनमधून भारतात पोहचले, तर 20ए, बी आणि सी ब्रिटेन, इटली तसेच सौदी अरबमधून आले. 20ए देशाच्या जवळपास सर्वच भागात आढळला, ज्यापैकी बहुतांश उद्भव इटली आणि सौदी अरबमधील आहे. ब्रिटन आणि स्वीझरलँडमधून सुद्धा व्हायरस आले आहेत, परंतु त्याचे प्रमाण खुप कमी आहे.

सिक्वेंसिंग परिणाम सांगतात की, 20बी स्ट्रेन ब्रिटनमूधन आला आणि देशातील बहुतांश भागात पोहचला, परंतु देशाच्या पश्चिम भागात 20बी चे असे स्ट्रेन सुद्धा मिळाले जे ब्राझीलमधून आले होते, तर दक्षिण भारतात काही भागात हेच स्ट्रेन इटली आणि ग्रीसमधून पोहचले. हे विश्लेषण हे सुद्धा सांगते की, उत्तर आणि पूर्व भारतात कोरोनाच्या 20ए स्ट्रेनची प्रकरणे 50 टक्क्यांपेक्षा जास्त सापडली, तर दक्षिण आणि पश्चिम भागात 20बी सर्वाधिक 75 टक्के आढळून आला. 19 ए आणि बी कोरोना स्ट्रेन जे जास्त प्रमाणात चीनमूधन पोहचले होते, त्यापैकी 19ए चे सर्वाधिक प्रमाण उत्तर भारतात सुमारे 20 टक्के आढळले. तर पूर्वमध्ये हे 15 तसेच पश्चिम आणि दक्षिण भागात 6-7 टक्केपेक्षा जास्त नव्हते.

या विश्लेषणातून स्पष्ट होते की, चीनमधून आलेल्या कोरोना स्ट्रेनचा प्रसार देशात सर्वात कमी झाला. याचे कारण स्पष्ट आहे की, चीनच्या विमानांचे विमानतळांवर स्क्रीनिंग होत होते, तर युरोप आणि अन्य देशांच्या फ्लाईटच्या स्क्रीनिंगचा निर्णय नंतर घेतला गेला होता. याच्याशिवाय या पाचही स्ट्रेनमध्ये काही किंचित म्यूटेशन सुद्या आढळले आहे, ज्यांच्या प्रभावाचा अभ्यास केला जात आहे. हे सिक्वेंसिंग औषध, वॅक्सीन आणि तपास तंत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यातून आपल्याला हे सुद्धा समजते की, कशाप्रकारे देशात व्हायरस आला आणि त्याचा संसर्ग कसा पसरला.