Ganesh Chaturthi 2020 : ‘या’ वेळेत करा गणेश मूर्तीची स्थापना, ठरेल ‘शुभ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या वर्षीचा गणेशोत्सव भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी 22 ऑगस्ट शनिवारी सुरू होईल. याच दिवशी गणेशभक्त गणेश मूर्तीची स्थापना आपल्या घरात करतात. असे म्हटले जाते की भगवान गणपती आपल्या भक्ताचे संकट नाहीसे करतात. 10 दिवसांनी अनंत चतुर्थी च्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते.

भगवान गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सुख शांती या सर्वांची देवता मानले जाते.गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना करणे चांगले असते. यावर्षी 21 ऑगस्टला सकाळी 11 वाजता चतुर्थी सुरू होईल. 22 ऑगस्टला संध्याकाळी 7.57 पर्यन्त चतुर्थी सुरू राहील. यामध्ये तुम्ही गणेश मूर्तीची स्थापना करू शकता.

पूजेचा मुहूर्त दुपारी 12.45 वाजता आहे. विशेष मुहूर्त दुपारी 11.45 ते 12.45 या वेळेत आहे. गणेश मूर्तीची स्थापना करताना लक्षात ठेवा की मूर्तीचे तोंड पूर्व दिशेला असावे. पूजेच्या आधी एक संकल्प घ्यायचा असतो. गणपतीला धूप, फूल, मोदक, दूर्वा अर्पण करावे. त्यानंतर आरती करावी.