गौतम गुलाटीनं शेअर केला उर्वशी रौतेलासोबत लग्नाचा फोटो ! म्हणाला – ‘अभिनंदन नाही करणार का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेता गौतम गुलाटीनं अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. फोटोत गौतम आणि उर्वशी सात फेरे घेताना दिसत आहेत. तुम्हालाही वाटेल की दोघांनी खरंच लग्न केलंय का. परंतु असं अजिबात नाही. कारण तिनं खरंच लग्न केलंय असं अजिबात नाही.

फोटोबद्दल बोलायचं झालं तर हा फोटो आगामी सिनेमा व्हर्जिन भानुप्रिया मधील एका सीनचा आहे. गौतमनं हा फोटो शेअर करत लिहलं की, अभिनंदन नाही करणार का ? मित्रांनो आमचा सिनेमा व्हर्जिन भानुप्रिया येत आहे. आशा आहे की, तुम्हाला सर्वांना हा सिनेमा तु्म्हाला आवडेल.

व्हर्जिनु भानुप्रिया सिनेमात गौतम गुलाटी, उर्वशी रौतेला, अर्चना पूरण सिंह, डेलनाज इराणी, राजीव गुप्ता, ब्रिजेंद्र काला, निकी अनेजा आणि रुमाना मोला आहे.

अलीकडेच उर्वशी रौतेला हिनं तिचा आगामी कॉमेडी सिनेमा व्हर्जिन भानुप्रिया सिनेमाच्या रिलीज प्लॅटफॉर्मबद्दलचा संशय दूर केला होता. हा सिनेमा झी 5 वर रिलीज केला जाणार आहे असं तिनं सांगितलं होतं. उर्वशीनं इंस्टावरून यासंदर्भात घोषणा केली होती.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून सिनेमाचं पोस्ट शेअर करत सर्व माहिती दिली होती. पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, “स्टोरी कॉलेजला जाणाऱ्या साध्या सरळ मुलीची आहे. तिला तिच्यासाठी एका पार्टनरची गरज आहे. लवकरच रिलीज होत आहे झी 5 वर.”

सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं तर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी सिनेमा 12 जून रोजी थिएटर मध्ये रिलीज करण्याचा प्लॅन होता.