‘दंगल गर्ल’ गीता फोगाट बनणार ‘आई’ , शेयर केली ‘भावूक’ पोस्ट !

पोलीसनामा ऑनलाईन : भारताची नामांकित महिला कुस्तीगीता गीता फोगाट आई बनणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आणि एक खास संदेश लिहून ही खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत गीताने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले असून याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत.

नोव्हेंबर २०१६ मध्ये गीताने कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केले. गीता इन्स्टाग्रामवर तिचा प्रेग्नन्सी फोटो शेअर करताना लिहिले की, ‘जेव्हा तुमच्यात नवीन जीवन येते तेव्हा तुम्हाला आई होण्याचा आनंद होतो. जेव्हा त्याची पहिली धडधड ऐकू येते आणि पोटातील किक की ती कधीही एकटी नसल्याची आठवते आईला होते. जोपर्यंत हे तुमच्यात होत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अर्थ नीटपणे उमगत नाही.’

मागील काही काळ गीता कुस्तीपासून दूर होती. गीताच्या बायोपिक ‘दंगल’ मध्ये आमिर खान आणि फातिमा सना शेख दिसले होते. हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटात गीताची भूमिका फातिमा सना शेख यांनी केली होती, तर बालपणीची गीता फोगट झयरा वसीमने साकारली होती, जिने आता चित्रपटसृष्टी सोडली आहे. आमिर खान यांनी गीताचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांची भूमिका निभावली आहे

तिची बहीण बबीता कुमारी आणि चुलत भाऊ विनेश फोगाटसुद्धा कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्ण पदक विजेते आहेत. २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोघांनीही आपापल्या प्रकारात सुवर्ण पदके जिंकली. गीता फोगाटची आणखी एक धाकटी बहीण रितु फोगाटसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तराची कुस्तीपटू आहे आणि २०१६ च्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकली आहे. तिची सर्वात लहान बहीण, संगीता फोगट देखील ही कुस्तीपटू आहे. २० नोव्हेंबर २०१६ रोजी गीताने सहकारी कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केले.

आरोग्यविषयक वृत्त –