ज्यावेळी तुम्हाला मिळतात ‘हे’ संकेत, समजून जा की लवकरच माता ‘लक्ष्मी’चं होतंय तुमच्याकडं आगमन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणजेच धनलक्ष्मी मानले जाते. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की एखाद्याला देवी लक्ष्मीने आशीर्वाद दिला तर त्याचे सर्व त्रास दूर होतात. त्याच्याकडे कधीही धन-संपत्तीचा अभाव नसतो. पण माता लक्ष्मीला चंचल स्वभावाचे मानले जाते. असे म्हणतात की माता लक्ष्मी एकाच ठिकाणी टिकून राहत नाही.असे मानले जाते की माता लक्ष्मीआगमनाच्या आधी काही संकेत देते. ज्याद्वारे धनलाभ होणार आहे याची माहिती मिळते. आज अशाच काही मुख्य संकेतांबद्दल जाणून घेऊया, जे माता लक्ष्मीच्या आगमनाचे सूचक आहेत.

– माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे. असे म्हणतात की घुबड अवती-भोवती दिसल्यास समजावे की माता लक्ष्मी प्रसन्न झाली आहे आणि लवकरच घरात येणार आहे.

– हिरवळीस समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर आपल्या सभोवताल बरीच हिरवळ आहे किंवा हिरव्यागार गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतील. तर समजावे की माता लक्ष्मी आशीर्वाद देणार आहे.

– जर तुम्हाला घराच्या बाहेर कुणी बर्‍याचदा झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की लवकरच आपले नशीब बदलणार आहे.

– सकाळी शंखाचा आवाज ऐकणे देखील शुभ लक्षण मानले जाते. या व्यतिरिक्त जर व्यवहाराच्या वेळी पैसे हातातून सुटले तर समजून घ्या की माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे.

– असा विश्वास आहे की सकाळी उठल्यानंतर जर भिकारी दिसला तर धनलाभ होणार आहे असे समजावे.