‘सोन्या-चांदी’च्या घसरणीनं तोडला 5000 वर्षांतील ‘रेकॉर्ड’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एकीकडे शेअर बाजार कोसळत असताना दुसरीकडे चांदीची चमकसुद्धा कमी होत चालली आहे. सोन्याच्या भावातही चार हजार रूपये प्रति दहा ग्रॅमची घसरण झाली आहे. या सर्व घसरणींचा आणखी एक विक्रम बनला आहे. तो म्हणजे सोने आणि चांदीच्या भावाने घसरणीचा पाच हजार वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. एक किलो सोन्यात 122 किलो चांदी मिळत आहे. तर पाच हजार वर्षांपूर्वी एक किलो सोन्यात 205 किलो चांदी मिळत असे. ही आश्चर्यकारक माहिती नॅस्डॅकने प्रसिद्ध केली आहे.

यासाठी नॅस्डॅकने पाच हजार वर्षांपूर्वी मिस्त्रचा राजा फराओच्या रेकॉर्डशी तुलना केली आहे. तोपर्यंत एक किलो सोन्यात अडीच किलो चांदी मिळत होती. ई.स. पूर्व 1750 हम्मूराबीच्या काळात एक किलो सोन्याच्या वस्तूंमध्ये सहा किलो चांदी मिळू लागली. ई.स. पूर्व 560 ग्रीसचा महान शासक क्रोएससला सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची सवय होती. त्याच्याच काळात सोन-चांदीची नाणी बाजारात आणण्यात आली होती. तेव्हा धातूंमधील अंतर 13 पट झाले होते.

हळू-हळू दोन्ही धातूंचे महत्व बदलत गेले. सोने खुपच किमती झाले. याच कारणामुळे बुधवारी एक किलो सोन्याचा भाव 123 किलो चांदीच्या बरोबरीने होता. याच गतीचा अंदाज याच्याशी लावता येऊ शकतो की, मागच्या वर्षी एक किलो सोन्याचा भाव 80 किलो चांदीच्या बरोबरीचा होता. म्हणजे अवघ्या एक वर्षाच्या आत चांदीने एक किलो सोन्याच्या तुलनेत आपली चमक 43 किलोने गमावली आहे.

अखिल भारतीय स्वर्णकार विकास परिषदेचे अध्यक्ष पुष्पेंद्र जयस्वाल यांनी सांगितले की, हे अंतर वाढत चालले आहे. गुरुवारी सोन्याने 41 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर पार केला, तर चांदी 37 हजार रुपये किलोच्या आसपास आहे. बाजारात मागणी कमी झाल्याने चांदीची डिलिव्हरी चार दिवसानंतर होत आहे.