सोनं उतरलं, चांदी स्थिरावली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक स्तरावर सोन्याने सामान्यांना त्रस्त केले असताना आज सोनं 400 रुपयांनी स्वस्त झालं. मागील तीन आठवड्यातील सोन्याच्या भावातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आज सोन्याचे भाव 400 रुपयांनी कमी झाल्याने सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 38,970 रुपये प्रति दहा ग्राम झाले आहे. चांदीचे भाव देखील 100 रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे चांदी 48,000 रुपये प्रति किलोग्रामने विकली जात आहे.

मागील 4 दिवसापासून सोन्याच्या किंमती आटोक्यात येत आहेत. मागील चार दिवसात सोने 1,500 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीचे दर देखील मागील 5 दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मागील 5 दिवसात चांदी 3,600 रुपयांनी स्वस्त झाली.

सोन्याचे भाव काही अंशी कमी होत असल्याने सामान्य ग्राहकांना थोडा दिलासा मिळताना दिसत आहे. कारण सोन्याने मागील काही दिवसांपासून उच्चांक गाठला आहे. काही दिवसांपूर्वी सोने 40,000 रुपयांपलीकडे गेले होते.

लंडनच्या आणि न्यूयॉर्कच्या सराफ बाजारात सोन्याची किंमती 1,495.25 डॉलर प्रति औंस आहे, तर जागतिक स्तरावर चांदी 17.95 डॉलर प्रति औंस आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. तसेच जगात मंदी सदृश्य परिस्थिती असल्याने लोक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे सोन्याची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. परंतू मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहे.

You might also like