Gold Prices Today : सोन्याच्या किमतीमध्ये 1011 रुपयांची ‘उसळी’, चांदीने घेतली 3975 रुपयांची मोठी ‘उडी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Gold Price Today 27th July 2020 : सोने-चांदीच्या किमतीने आज आणखी एक इतिहास रचला आहे. सोन्याचा भाव 1011 रुपयांनी उसळी घेत आज 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला. तर चांदीने 3975 रुपये प्रति किलोची मोठी उडी मारली आहे. आज म्हणजे सोमवारी देशभरातील सराफा बाजारात सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 52135 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला. तर चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज चांदी 3975 रुपये प्रति किलो महाग होऊन 63860 रुपये प्रति किलोच्या दराने खुली झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार 27 जुलै 2020 ला देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीचे भाव असे होते…

धातु 27 जुलैचा रेट (रु./10 ग्रॅ.) 24 जुलैचा रेट (रु./10 ग्रॅ.)
रेटमध्ये बदल (रु./10 ग्रॅ.)
गोल्ड 999 (24 कॅरेट) 52135 51124 1011
गोल्ड 995 (23 कॅरेट) 51926 50919 1007
गोल्ड 916 (22 कॅरेट) 47756 46830 926
गोल्ड 750 (18 कॅरेट) 39101 38343 758
गोल्ड 585 ( 14 कॅरेट) 30499 29908 591
सिल्व्हर 999 63860 रू/कि.ग्रॅ. 59885 रू/कि.ग्रॅ. 3975 रू/कि.ग्रॅ.

6 दिवसांपासून सोने-चांदीचे उड्डाण जारी
मागील सहा कामकाजाच्या दिवसात सोने 2918 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले तर चांदीने 11512 रुपये प्रति किलोग्रॅमची मोठी उडी घेतली. आज सोमवार 27 जुलैला सोने भाव 52135 रुपयांवर खुला झाला, तर मागील सोमवारी 20 जुलैला देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 49217 रुपयांवर बंद झाले होते. या सहा कामकाजाच्या दिवसात सोन्याने 2918 रुपयांची उडी घेतली. तर चांदी 11512 रुपये प्रति किलो ग्रॅम 52188 रुपयावरून उसळी घेत 63860 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

वायदे बाजारात सुद्धा सोने-चांदीची किंमत उसळली
वायदे बाजारात सुद्धा सोने-चांदीचे उड्डाण जारी होते. मागणीतील तेजीमुळे आज सोन्याचा वायदे बाजारातील भाव 825 रुपयांनी उसळी घेत 51,860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. एमसीएक्सवर आज सोने वायदे बाजारात 1.62 टक्क्यांची तेजी होती आणि या भावाने 5,048 लॉटचा व्यवसाय झाला. तर न्यूयार्कमध्ये सोने 1.89 टक्के उसळत विक्रमी 1,961.60 डॉलर प्रति औंसवर पोहचले. चांदीबाबत बोलायचे तर आज एमसीएक्सवर याचा वायदा भाव 3,360 रुपयांनी वाढून 64,583 प्रति किलोवर बंद झाला. सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदीच्या वायदे भावात आज 5.49 टक्क्यांची वाढ झाली. चांदी वायदे बाजारात 64,583 प्रति किलोच्या दराने आज 14,636 लॉटचा व्यवसाय झाला.

का वाढत आहेत सोने-चांदीचे दर
चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापार तसेच अनेक बाबतीत तणाव वाढला आहे. कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी आणि चीनद्वारे हाँगकाँगसाठी एक कठोर नवा सुरक्षा कायदा लादल्याने अमेरिका आणि चीनमध्ये एका नव्या शीत युद्धाला सुरूवात झाली आहे.

याचा परिणाम सुद्धा दोन्ही धातूंच्या किमतीवर दिसून येत आहे. तर डॉलर निर्देशांक आज 0.5% घसरून आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अनेक वर्षांच्या खालच्या स्तरावंर पोहचला, ज्यामुळे सोने अन्य देशांसाठी स्वस्त झाले, ज्यामुळे त्याची खरेदी वाढली. भारतात यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, औद्योगिक हालचालींमध्ये वाढ होण्याच्या अपेक्षेने चांदीत वाढ झाली आहे.

केडिया कमोडिटीजचे डायरेक्टर अजय केडिया यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसचे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. यामुळे शेयर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे, तर रियल इस्टेटसुद्धा मंदावला आहे. अशा काळात गुंतवणुकदारांना सर्वात सुरक्षित सोनेच दिसत आहे. गुंतवणुकदारांचा ओढा गोल्ड, गोल्ड ईटीएफ आणि बॉन्डकडे वाढत आहे. याच कारणामुळे सोन्याचे दर वाढत चालले आहेत. तर कोरोना व्हायरस संसर्गामुळे उत्खनन कार्य प्रभावित झाल्याने आणि पुरवठा बाधित झाल्याने चांदीच्या किंमतीत जास्त तेजी दिसत आहे.