मोगॅम्बो खुश हुवा ! ‘गुगल’चे ‘डुडल’द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते अमरीश पूरी यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त गुगुलने त्यांचे ‘डुडल’ तयार करुन त्यांना अभिवादन केले आहे. सर्वाधिक लोकप्रिय खलनायक म्हणून अमरिश पुरी ओळखले जातात. त्यांचा ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलाॅग अजूनही लोकप्रिय आहे. असे असले तरी गुगल ने त्यांच्या ‘आय लव्ह माय इंडिया’ असे सांगणाऱ्या ‘परदेस’ मधील बाबुजींची प्रतिमा वापरली आहे.

Image result for अमरीश पुरी आहेत

अमरीश पुरी यांचा २२ जून १९३२ मध्ये जन्म झाला. लाला निहालचंद आणि वेद कौर यांच्या पाच अपत्यांपैकी अमरीश हे तिसरे आणि अभिनेते मदन पुरी यांचे लहान बंधु होते. त्यांनी १९७० ते २००५ या काळात हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अमरीश पुरी हे खलनायक म्हणून सर्वाधिक लोकप्रिय ठरले.

Related image

त्यांचा पहिल्यापासून अभिनयाकडे कल होता. चित्रपटात काम मिळविण्यासाठी त्यांनी १९५४ मध्ये पहिल्यांदा ऑडिशन दिले होत. मात्र, त्यात त्यांना रिजेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी रंगभूमी आणि व्हॉइस ओव्हर देण्यास सुरुवात केली. अमरीश पुरी यांना १९७१ मध्ये ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात पहिली संधी मिळाली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४००हून अधिक चित्रपटात काम केले. हॉलिवूडमधील अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ऑस्कर विजेत्या ‘गांधी’ मध्ये खान यांची भूमिका त्यांनी केली होती.

Image result for अमरीश पुरी आहेत

अमरीश पुरी यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. असे असले तरी ‘मिस्टर इंडिया’मधील ‘मोगँबो’ ही खलनायकी भूमिका इतकी लोकप्रिय झाली की त्या नावानेच अमरीश पुरी यांना ओळखले जाऊ लागले. ‘मोगँबो खुश हुआ’ हा डायलाॅग लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या तोंडी होता. मोगँबो ने नाव कायमचे चिकटले. त्यांचे १२ जानेवारी २००५ रोजी मुंबई येथे निधन झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स 

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु 

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय