Coronavirus : केंद्र सरकारनं ‘कोरोना’बाबत घोषित केली ‘हेल्पलाईन’, जाणून घ्या तुमच्या राज्याचा ‘नंबर’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात विविध राज्यातून समोर येत असलेली प्रकरणे आणि जागतिक आरोग्य संघटनेने यास महामारी घोषित केल्यानंतर भारत सरकारने सर्व राज्यात कोरोना व्हायरससाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. भारतात कोरोना व्हायरसची 14 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर याचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या वाढून 74 झाली आहे.

 

सरकारने देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने केंद्रीय हेल्पलाईन नंबर 011-23978046 सुरू केला आहे. याशिवाय 15 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये सुद्धा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

या माहितीत म्हटले आहे की, बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्किम, तेलंगाना, उत्तराखंड, दादर आणि नगर हवेली, दमन-दीव, लक्षद्वीप आणि पदुचेरीसाठी कोरोना व्हायरस संबंधी माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर 104 चा वापर करण्यात येत आहे.

तसेच मेघालय 108 आणि मिझोरम 102 नंबरची हेल्पलाईन वापरण्यात येत आहे. कोरोना व्हायरस संबंधी माहिती देण्यासाठी केंद्रीय हेल्पलाईन नंबर 011-23978046 सुरू करण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या 14 नवीन प्रकरणांपैकी 9 प्रकरणे महाराष्ट्रातील आणि प्रत्येकी एक-एक प्रकरण दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये समोर आले आहे. तसेच एका परदेशी नागरिकाला सुद्धा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.