Coronavirus : राजधानी दिल्लीतून आली दिलासादायक बातमी ! 92 रेड झोनपैकी अर्धे ऑरेंज झोन बनले, 14 दिवसात एकही रूग्ण नाही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, दिल्ली सरकारद्वारे चिन्हित 92 कोरोना सक्रिय भागांपैकी अर्ध्या क्षेत्रांत गेल्या 14 दिवसांत एकही कोविड – 19 प्रकरण उघडकीस आले नाही आणि येत्या 15 दिवसांत हे क्षेत्र ग्रीन झोनमध्ये बदलले जाऊ शकते. सरकारने कोविड-19 प्रकरणे नोंदविणाऱ्या या भागात मार्चअखेर प्रतिबंध क्षेत्रे म्हणून अधिसूचित करणे सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 126 क्षेत्रे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. गेल्या काही आठवड्यांत, अधिकाऱ्यांनी यापैकी 34 क्षेत्रे त्यांच्या रेड झोनमधून काढून टाकली आहेत, ज्यामुळे सक्रिय झोनची संख्या 92 पर्यंत कमी झाली आहे.

कोरोना विषाणूची प्रकरणे भारतात दररोज वाढत आहेत आणि दररोज सर्वात जास्त प्रकरणांची रेकॉर्ड ब्रेक नोंद होत आहे. आजही कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे नोंदविली गेली. देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूची 6654 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि सुमारे 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढून 125101 वर पोहोचली आहे. तर 3720 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकूण 125101 प्रकरणांपैकी 69597 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 45299 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले म्हणजेच ते बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सर्वाधिक 1517 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा सर्वाधिक नाश होत आहे. महाराष्ट्रात कोविड -19 चे एकूण 44582 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 12583 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 1517 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

You might also like