एयर फ्रान्स 18 जुलैपासून भारताच्या ‘या’ 3 शहरातून पॅरिससाठी सुरू करणारविमान सेवा, हरदीप पुरी यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी गुरूवारी म्हटले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेनंतर सरकारची तीन देशांसोबत चर्चा अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये आहे. हे देश – फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनी आहेत.

एका प्रेस कॉन्फरन्समध्ये हरदीप पुरी यांनी म्हटले, जोपर्यंत कोरोनाच्या बाबतीत स्थिती पूर्वपदावर येत नाही, मला वाटते की, द्विपक्षीय उड्डाणच एक मार्ग आहे, ज्यामध्ये आपण ठरवलेल्या अटींच्या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांना घेऊन जाऊ शकतो. कारण, आपल्या प्रमाणेच अनेक देशांनी सुद्धा प्रतिबंध लावून ठेवले आहेत.

ते म्हणाले की, किमान तीन देश – फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनीसोबत विमानसेवेबाबत खुपच अ‍ॅडव्हान्स स्टेज आहे. एयर फ्रान्स भारतातील तीन शहरे दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूतून 18 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत आपली विमानसेवा जारी ठेवेल.

पुरी यांनी म्हटले, अमेरिकेबाबत बोलायचे तर युनायटेड एयरलाईन्ससोबत आमचा करार झाला आहे की भारत आणि अमेरिकेमध्ये 17 जुलै ते 31 जुलै दरम्यान 18 फ्लाइट्स चालवले जातील. परंतु, हे अंतरिम आहे. जर्मनीला एक विनंती करण्यात आली आहे आणि लुफ्थान्सासोबत करार जवळपास झाला आहे.

त्यांनी म्हटले की, नागरी उड्डाणचे ऑपरेशन्स सामान्य होणे व्हायरसच्या स्थितीवर अवलंबून आहे. सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, प्रत्येक प्रवासी जो परदेशातून भारतात येईल त्यास सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल. पुरी म्हणाले, सरकारने कोरोनामुळे लावलेल्या प्रतिबंधात अडकलेल्या 6 लाख 87 हजार 467 नागरिकांनासुद्धा परत आणले आहे.