‘हेल्थ इन्शुरन्स’ निवडताना छोटया चुकीमुळं होऊ शकतं मोठं नुकसान, ही काळजी घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता आरोग्य विमा खरेदी करणं स्वस्त झालं असलं तरी माहितीच्या अभावामुळे चुकीचा विमा खरेदी करण्याची शक्यता कमी झालेली नाही. विमा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आरोग्या विम्याची योग्य माहिती न मिळाल्याने अनेकदा लोक चूक करतात. आरोग्य विमा निवडण्यात लहान चूकही मोठं नुकसान करू शकते.

गरजेनुसार निवडा विम्याची रक्कम
विम्याची निवड नेहमी आपल्या कुटुंबाची गरज लक्षात घेऊन करायला हवी. नवे नवे आजार, आरोग्या विम्याअंतर्गत मिळणारी सुरक्षा रुग्णालयातील वाढता खर्च, दीर्घकालीन खर्च यांना लक्षात घेता पुरेशी असणं गरजेची आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आरोग्य विमा सहसा धोका-टाळण्याच्या पर्यायाऐवजी कर बचत करणारे साधन म्हणून वापरला जातो. परंतु आता ही विचारसरणी वेगाने बदलत आहे.

कोणत्या गोष्टींचा समावेश आहे किंवा नाही
आरोग्य विमा घेण्याआधी विमा कंपनीकडून हे जाणून घ्या यात कोणत्या आजारांवरील उपचाराचा खर्च समाविष्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, हा विमा तुमच्या गरजेत बसत नाही तर तुम्ही दुसरी पॉलिसी निवडू शकता. यात कोणत्या आजारांचा समावेश नाही हेही जाणून घ्या. प्रत्येक विमा कंपनीचे आपापले नियम असतात आणि त्यानुसार ती कंपनी पॉलिसी डिजाईन करत असते. काही पॉलिसींमध्ये गंभीर आजारांचा आढावा घेण्यास मदत केली जाते आणि काही बाबतींत घरगुती कारणांमुळे अपघात झाल्यास कव्हरेज मिळत नाही.

विमा कंपनीला योग्य माहिती द्या
अनेकदा असे समोर आले आहे की, आरोग्य विमा असूनही कंपनी उपचाराचा खर्च देण्यास मनाई करते. याचे कारण म्हणजे, विमा धारकाने विमा घेण्याआधी आपल्या मेडिकल रेकॉर्ड म्हणजे आजारांची, चुकीच्या सवयींची योग्य ती माहिती विमा कंपनीला दिलेली नसते. अधिकचा विमा हप्ता देण्यापासून बचाव करण्यासाठी असे केले जाते. त्यामुळे विमा कंपनीला आपली चुकीची माहिती देऊन नये.

Visit : Policenama.com