दिलासादायक ! ‘कोरोना’चा रिकव्हरी रेट वाढून 41.61 % झाला, 60490 लोक झाले बरे : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशभरात कोरोना संसर्गाचे रूग्ण वेगाने वाढत आहेत आणि रूग्णांचा हा आकडा 1 लाख 45 हजारच्या पुढे गेला आहे. मात्र, यामध्ये एक दिलासादायक बाब सुद्धा आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, देशात कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये लागोपाठ वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयात संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोविड-19 मधून आतापर्यंत 60,490 लोक बरे झाले आहेत.

आरोग्य विभागाने सांगितले की, रिकव्हरी रेटमध्ये लागोपाठ वाढ होत आहे आणि सध्या तो 41.61 टक्के आहे. त्यांनी सांगितले, कोविड-19 मृत्यूदर 15 एप्रिलच्या 3.3 टक्क्यावरून घटून 2.87 टक्के झाला आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. लव अग्रवाल यांनी म्हटले की, लॉकडाऊनमुळे देशात कोरोना संसर्गाच्या केसेस कमी झाल्या आहेत. त्यांनी म्हटले की, सध्या मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग हेच उपाय आहेत. पूर्ण जग कोरोना व्हायरसविरूद्ध चांगली लढाई लढत आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, जगभरात कोरोनामुळे मरणार्‍यांचा दर 4.4 प्रति लाख आहे. तर भारतात मृत्युदर 0.3 प्रति लाख आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. वेळीच कोविड-19 ची जाणीव झाल्याने आणि त्याचे व्यवस्थापान करण्यासह लॉकडाऊन केल्याने हे शक्य झाले आहे.