Holi Special Recipe : होळीच्या सणाला बनवा देशी स्टाईलची थंडाईवाली रसमलाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  होळीच्या सणाला ट्रेडिशनल डिशेस बनवण्याची एक वेगळीच के्रझ असते. होळीला थंडाई सर्वात कॉमन असली तरी तुम्हाला ही एका ट्विस्टसह बनवायची असेल तर थंडाईवाली रसमलाई आवश्य ट्राय करा. अशी बनवा होळी स्पेशल रेसिपी थंडाईवाली रसमलाई…

रेसिपी-

साहित्य :

2 कप दूध
3 कप साखर
1 चमचा वेलची
2 चमचे पिस्ता
2 चमचे काळीमिरी
3 लीटर पाणी
1 चमचा बडीशेप
2 चमचे बदाम
2 चमचा टरबूजचे बी
1 चम्मच गुलाबजल
अर्धा कप रोज पेटल
मेन डिशसाठी
1 चमचा मैदा
7 चमचा व्हिनेगर
3 लीटर पाणी
4 कप साखर

कृती :

* एका वाटीत काही बदाम, पिस्ता आणि टरबूजचे बी तीन-चार तासासाठी भिजवून ठेवा. यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवून घ्या.

* एका पॅनमध्ये वेलची, बडीशेप आणि काळीमिरी वाटून घ्या. यानंतर वाटून पावडर बनवा.

* एका पातेल्यात दुध उकळवा आणि त्यामध्ये केशर आणि साखर टाळा. ते थंड होऊद्या

* सर्व ड्रायफ्रूट्स आणि वाटलेले मसाले त्यामध्ये मिसळा. यानंतर त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका. थंडाई तयार आहे.

आता रसमलाई बनवण्याची कृती

* 4-5 कप पाण्यात व्हिनेगर टाका.

* हे व्हिनेगर दुधात टाकून तोपर्यंत गरम करा जोपर्यंत दुधाचे सॉलिड होत नाही.

* नंतर हे कपड्यात टाकून सर्व पाणी पिळून काढा. हे वेगळ्या भांड्यात ठेवा.

* यामध्ये थोडा मैदा टाकून मळून घ्या. यानंतर याचे गुलाबजाम सारखे गोळे तयार करा. यानंतर पाण्यात साखर टाकून उकळवा आणि पाक बनवा.

* रसमलाई पाकात टाकून 5-10 मिनिटे उकळवा. नंतर ते काढून जादा पाक असेल तो काढून टाका आणि वर थंडाई टाकून सर्व करा.