Amazon India-IRCTC partnership : अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर बुक करु शकाल ट्रेनची तिकिटे, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता तुम्ही देखील ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे तिकिट बुक करु शकता. अ‍ॅमेझॉन इंडियाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सह भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत अ‍ॅमेझॉन युजर्स कन्फर्म ट्रेनची तिकिटे मिळवू शकतील.

या वैशिष्ट्याअंतर्गत पहिल्या बुकिंगवर कॅशबॅक देण्यात येईल. हे कॅशबॅक अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 12 टक्के आणि नॉन प्राइम मेंबर्ससाठी 10 टक्के असेल. कोणतेही अतिरिक्त सेवा शुल्क लागणार नाही. अ‍ॅमेझॉनच्या व्यासपीठावर सीट चेक, सर्व वर्गात कोटा सेवा आणि पीएनआर स्टेटसची सुविधा असेल.

अ‍ॅमेझॉन पेद्वारे पैसे देणार्‍या ग्राहकांना ट्रेन रद्द झाल्यास किंवा बुकिंग अयशस्वी झाल्यास त्वरित परतावा देखील मिळेल. हे वैशिष्ट्य Android आणि iOS वर सर्व प्रकारच्या फोनवर उपलब्ध असेल. या सुविधेचा लाभ 15 नोव्हेंबरपर्यंत मिळू शकेल.

अशाप्रकारे आपण अ‍ॅमेझॉनवर ट्रेनची तिकिटे बुक करू शकता

1. हे वैशिष्ट्य अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या नवीन आवृत्तीवर उपलब्ध असेल. आपण मोबाईल वरून बुकिंग करत असल्यास ट्रेनचे तिकिट उघडण्यासाठी तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

2. Amazon.in वर जा आणि ट्रेन तिकिट ऑपशनवर क्लिक करा.

3. आपली ट्रेन निवडा.

4. पेमेंट सेक्शन पेजवर क्लिक करा आणि योग्य ऑफर निवडा.

5. आपल्या ट्रेन प्रवासाची माहिती भरा आणि पेमेंट करा.

6. पेमेंट झाल्यानंतर तिकिट बुक केले जाईल. उर्वरित माहिती Amazon.in वर मिळेल.