जेलमध्ये गौतम नवलखा यांचा चष्मा चोरी झाल्याने हायकोर्टाने म्हणाले – ‘मानवता सर्वात महत्वाची’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   मुंबई हायकोर्टने तळोजा जेलमध्ये बंद भीमा कोरेगाव हिंसेतील आरोपी आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा चष्मा कथित प्रकार चोरी होण्याच्या प्रकरणात मंगळवारी म्हटले की, मानवता सर्वात महत्वाची आहे. यासोबतच न्यायालयाने जेल अधिकार्‍यांना कैद्यांच्या आवश्यकतांबाबत संवेदनशील बनवण्यासाठी एक वर्कशॉप आयोजित करण्यावर जोर दिला.

नवलखा हे एल्गार परिषद कथित माओवादी प्रकरणातील आरोपी आहेत. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कार्णिक यांच्या एका खंडपीठाने म्हटले की, आम्हाला समजले आहे की कशाप्रकारे जेलच्या आत नवलखा यांचा चष्मा चोरीस गेला आणि कुटुंबियांनी कुरियरने पाठवलेला नवीन चष्मा जेल अधिकार्‍यांनी घेण्यास नकार दिली.

न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, मानवता सर्वात महत्वपूर्ण आहे, यानंतर कोणतीही वस्तू येते. आज आम्हाला नवलखांच्या चष्म्याबाबत माहिती झाले. आता जेल अधिकार्‍यांसाठी सुद्धा एक कार्यशाळा आयोजित करण्याची वेळ आली आहे. त्यांनी म्हटले, अशा छोट्या-छोट्या गोष्टी देण्यासाठी सुद्धा नकार दिला जाऊ शकतो का? हा मानवी विचार आहे का.

नवलखा यांच्या कुटुंबियांनी सोमवारी दावा केला होता की, त्यांचा चष्मा 27 नोव्हेंबरला तळोजा जेलच्या आत चोरीस गेला होता, जेथे नवलखा बंद आहेत. त्यांनी म्हटले की, जेव्हा त्यांनी नवलखा यांच्यासाठी नवीन चष्मा पाठवला तर जेल अधिकार्‍यांनी तो न स्वीकारता परत पाठवला.