World Cup 2019 : ‘सलामी’च्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ‘या’खेळाडुची ‘डोपिंग’ टेस्ट

लंडन : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ची उत्तेजक द्रव्य चाचणी करण्यात आली. आफ्रिकेविरुद्ध लढतीची तयारी जोरात सुरु असताना ही चाचणी घेण्यात आली. वाडाकडून ही चाचणी करण्यात आली. बाऊल स्टेडियमवर टीम इंडिया सराव करीत असताना वाडा चे उत्तेजक नियंत्रक अधिकारी बुमराहला उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी घेऊन गेले.

पहिल्या राऊंडमध्ये बुमराहची आधी युरीन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ४५ मिनिटांनी बुमराहच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. जसप्रीत बुमराह याची उत्तेजक द्रव्य चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताला बीसीसीआयने दुजोरा दिला आहे. मात्र, त्याच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाचे या टेस्टचा रिर्पोट काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संस्था वाडाकडून क्रिकेटपटुंची उत्तेजक द्रव्य चाचणी केली जाते. या चाचणीला खेळाडुंचा तसेच बीसीसीआयचा विरोध आहे. मात्र, ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने वाडाने खेळाडुंची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

स्पर्धा सुरु असताना ते कोणत्याही खेळाडुंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेऊ शकतात. त्यानुसार जसप्रित बुमराह याची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.