जर तुम्ही जास्तच बिअर पित असाल तर तुमचं वडिल बनण्याचं स्वप्न होवु शकतं भंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पुरुषाच्या वडील होण्याच्या स्वप्नांवर बिअर पाणी फिरवू शकते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, बिअरमुळे पुरुषांची वडील होण्याची क्षमता ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. बिअर पिण्यामुळे पुरुषांच्या पोटाचा आकार वाढतो आणि यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. हार्वर्ड विद्यापीठात केलेल्या संशोधनानुसार, पुरुषांच्या पोटावरील प्रत्येक दोन इंच अधिक चरबीमुळे वडील होण्याची क्षमता १०% कमी होते. तसेच मडक्याच्या आकाराचे पोट अत्यंत धोकादायक सांगितले आहे.

हार्मोनमध्ये होतो बदल

तज्ञांनी चेतावणी दिली की चरबीमुळे एक असे रसायन तयार होते, जे टेस्टोस्टेरॉनला स्त्री सेक्स हार्मोन ऍस्ट्रोजेनमध्ये रूपांतरित करते. केअर फर्टिलीटी क्लिनिकचे प्रोफेसर चार्ल्स किंग्सलँड म्हणाले, ज्यांचे पोट गोल मडक्यासारखे आहे त्यांनी सावध व्हा. अमेरिकन डॉक्टरांनी १८० पुरुष आणि महिलांवर आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी अभ्यास केला. आयव्हीएफ दरम्यान पुरुषांच्या पोटावर दोन इंच अतिरिक्त चरबी वाढल्याने महिलांना मूल होण्याची शक्यता नऊ टक्के कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोटाची चरबी सर्वात घातक

मुख्य संशोधक डॉ. जॉर्ज चावारो म्हणाले की, पोटावरील चरबी शरीराच्या इतर कोणत्याही भागातील चरबीपेक्षा अधिक धोकादायक रसायन बनवते. ते म्हणाले, ३२ इंचाची कंबर असलेल्यांच्या तुलनेत ४० इंच कंबर असलेल्या पुरुषांची वडील होण्याची शक्यता कमी असते.

पुरुषांनाही गरोदरपणाची तयारी करावी लागेल

ते म्हणाले, केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनाही गरोदरपणासाठी तयार रहावे लागेल. या संशोधनाच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, बाळंतपणासाठी फक्त महिलाच जबाबदार नाहीत तर पुरुषही तितकेच महत्त्वाचे आहेत. पुरुषांमधील वाढत्या लठ्ठपणामुळे शुक्राणू तयार होण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे आणि यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होत आहे.