नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने पाच वर्षांआधी खाते बंद करून सर्व रक्कम काढणाऱ्या खातेधारकांसाठी नियम कडक केले आहेत. त्यामुळे आता या कालावधीत रक्कम काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10 ते 34 टक्क्यांपर्यंत टॅक्स भरावा लागणार आहे. मात्र नोकरीचे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते निवृत्तीदरम्यान तुम्ही रक्कम काढल्यास तुमचे कोणत्याही प्रकारचे पैसे कापले जाणार नाहीत.
करार पद्धतीने आणि काही विशिष्ट कालावधीसाठी काम करणारे कर्मचारी आपले खाते लवकर बंद करून पैसे काढत असतात. मात्र आता पाच वर्षाच्या आत तुम्ही ईपीएफओ खाते बंद करणार असाल तर पॅन कार्ड आणि फॉर्म 15 भरावा लागणार आहे. हे दोन्ही कागदपत्रे दिल्यास 10 टक्के टॅक्स कापला जाईल अन्यथा 34.608 टक्के इतका टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे.
तसेच पाच वर्षांनंतर तुम्हाला या दोन्ही कागदपत्रांची गरज पडणार नाही. कोणत्याही प्रकारचं टॅक्स न कापता तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल. दरम्यान, ईपीएफओचे वरिष्ठ सदस्य राम किशोर त्रिपाठी यांनी याबाबत संगितले आहे कि, यामध्ये सूट दिली गेली पाहिजे. हजारो कर्मचारी अशाप्रकारे खाते बंद करत असतात. या कालावधीत ते पॅन कार्ड देखील तयार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना यामध्ये सूट दिली गेली पाहिजे.
Visit : Policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या