71 दिवसांमध्ये मोलकरणीनं मृत मालकाच्या ATM मधून काढले तब्बल 35 लाख, अशी अडकली जाळयात, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोलकत्यातून एक आश्चर्यचकित करून टाकणारी घटना समोर आली आहे. 71 दिवसात मोलकरणीने मेलेल्या मालकाच्या एटीएम मधून तब्बल 35 लाख 90 हजार रुपये काढले. पण कोलकाता पोलिसांच्या तावडीतून ती सुटू शकली नाही. कोलकत्याचे पोलिस या केसला एक रेयर केस असल्याचे सांगत आहेत.

45 वर्षीय मोलकरीण रीता रॉय ही कोलकत्याच्या अन्वर शाह रोडवर असलेल्या एक बिल्डिंग मध्ये कमाला होती. तिने मृत मालक सत्यनारायण आग्रवाल यांचं एटीएम कार्ड चोरलं. एक्सिस बँकेत त्यांचं खातं होतं. अग्रवाल सारखे पिन विसरून जायचे म्हणून त्यांच्या मुलाने पिन मोबाईलवर मेसेज केला होता. मोलकरणीने तो पिन मिळवला.

तिने नादीय जिल्ह्यात राहणाऱ्या तिच्या जावयाला पैसे काढण्यासाठी एटीएम देलं. अग्रवाल यांच्या मुलाला जेव्हा पैशांची चोरी झाल्याचे समजले तेव्हा त्याने याबाबतची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. बँकेचा रेकॉर्ड चेक केले असता माहिती समोर आली की, 20 मार्च ते 30 मे पर्यन्त एटीएम मधून पैसे काढले गेले. या सर्व एटीएम मशीन करीमपूर, कृष्ण नगर, रणाघट या ठिकाणचे होते. एटीएम मशीनच्या तिथे लावण्यात आलेल्या सिसिटीव्ही कॅमेरीच्या मदतीने याचा तपास लावण्यात आला. त्यानंतर लगेच रिता रॉयला तिच्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसानी तिच्या घरातून 27 लाख रुपये ताब्यात घेतले.