लॉकडाऊनमध्ये इनकम टॅक्स विभागानं रिफंडच्या रूपानं दिले 62361 कोटी रूपये, 20.44 लाख करदात्यांना दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आयकर विभागाने २०.४४ लाख करदात्यांना रिफंड म्हणून ६२,३६१ कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही रक्कम लॉकडाऊन दरम्यान परत केली गेली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी ही माहिती दिली. मंडळाने म्हटले आहे, “आयकर विभागाने ८ एप्रिल ते ३० जून दरम्यान दर सेकंदाला ७६ प्रकरणे परताव्यासाठी निकाली काढली. ती देखील केवळ ५६ दिवसातच.” आज मंडळाने सांगितले की, २० लाख ४४ हजारांहून अधिक प्रकरणांच्या परताव्याच्या स्वरूपात ६२,३६१ कोटी रुपये जाहीर केले गेले आहेत.

सीबीडीटीच्या म्हणण्यानुसार, करदात्यांच्या १,९०७,८५३ प्रकरणांमध्ये २३,४५३.५७ कोटी रुपयांचा परतावा आणि या कालावधी दरम्यान १३६,७४४ प्रकरणांमध्ये ३८,९०८.३७ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स परतावा देण्यात आला आहे. सीबीडीटीने पुढे म्हटले की, परतावा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी केला गेला आहे आणि करदात्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. या परतावा प्रकरणात सीबीडीटीने म्हटले की, “परताव्यासाठी कोणत्याही करदात्याला विभागाच्या किसर अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागला नाही. आता त्यांना परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात मिळाला आहे.”