भारताच्या क्रोधापुढं झुकला चीन, राजदूत म्हणाले – ‘विरोधी नव्हे तर दोन्ही देशांनी पार्टनर बनावं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमा वादामुळे निर्माण झालेला तणाव हळू- हळू कमी होत आहे. या दरम्यान, भारतातील चिनी राजदूतांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांनी सीमा विवाद वाटाघाटीद्वारे सोडवावेत. चीनी दूतावासाच्या यूट्यूब वाहिनीवर पोस्ट केलेल्या सुमारे 18 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये चीनी दूतावास सन विडोंग यांनी म्हंटले कि, प्रतिस्पर्ध्यांऐवजी भारत आणि चीन भागीदार असले पाहिजेत. दोन हजार वर्षांहून अधिक काळ चीन आणि भारत यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मी पाहिले आहे की अलीकडच्या काळात सीमाप्रश्नावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेचा प्रश्न संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे. समान सल्ला आणि शांत संवाद साधून आपल्याला योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.

सन विडोंग यांनी एका निवेदनात म्हंटले की, भारत आणि चीनने परस्पर आदरातून विश्वास निर्माण करण्याची आणि एकमेकांशी समान वागणूक देणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी ‘म्युच्युअल कोर इंटरेस्ट’ आणि प्रमुख चिंता यांची पूर्तता करण्याची गरज आहे. ते म्हणाले, ‘5 जुलै रोजी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी भारत-चीन सीमाप्रश्नावर दूरध्वनीवरून भाष्य केले. यावेळी दोन्ही बाजूंनी सीमेवर शांतता राखण्याचे मान्य केले. याशिवाय जमीनीतील तणाव कमी करण्यासाठी उच्च लष्करी अधिकारीही चर्चेत आहेत.

राजदूतांचे हे विधान पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित होते. त्यात म्हटले आहे की, प्रतिस्पर्ध्यांऐवजी भारत आणि चीन भागीदार असले पाहिजेत. दोन्ही देशांना संघर्ष होण्याऐवजी शांततेची आवश्यकता आहे. आमनेसामने येण्याऐवजी दोन्ही देशांना शांतता हवी आहे. तसेच शंका घेण्याऐवजी विश्वास वाढवण्याचीही गरज आहे. सन विडोंग यांनी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षाचाही संदर्भ दिला. विडोंग म्हणाले की, या घटनेमुळे गलवान खोऱ्यात अनेकजण शहिद झाले. ही एक अशी घटना होती, जी ना भारत पाहू इच्छितो ना चीन पाहू इच्छितो.”