भारतामध्ये चीनविरूध्द एकटं ‘उभं’ राहण्याची हिम्मत, ‘ड्रॅगन’ देखील हैराण : युरोपिय थिंक टँक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोर्‍यात 15 जूनला हिंसक हाणामारी झाल्यानंतर भारताने भविष्यात कोणत्याही सीमावादाच्या दरम्यान चीनच्या विरूद्ध एकट्याने उभे राहण्याचा विश्वास दाखवला आहे. भले ही अमेरिकेने बिजिंगच्या विरूद्ध क्वॉड अलायन्स बनवण्याची ऑफर दिली आहे, परंतु भारत एकटा उभा राहिल्याने ड्रॅगनसुद्धा हैराण आहे. एका युरोपीय थिंक टँकने हे वक्तव्य केले आहे.

पूर्व लडाखमध्ये हिंसक संघर्ष झाल्यानंतर भारत आणि चीनमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. याचे काही चांगले परिणामसुद्धा समोर आले आहेत. तसेच दोन्ही देशांचे लष्कर वादग्रस्त ठिकाणांवरून मागे हटले आहे, परंतु चीनी सैनिक देपसांग, गोरा, फिंगर भागातून अजूनही मागे हटलेले नाही.

युरोपीय फाऊंंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज (ईएफएसएएस) ने एका पुनरावलोकनात म्हटले आहे की, पँगोंग त्सो मध्ये डिसएंगेजमेंटच्या सुरवातीच्या प्रक्रियेत चायनीज फिंगर 2 वरून फिंगर 5 भागात मागे हटले, परंतु रिज लाइनवर अजूनही तैनात आहे. भारत जोर देत आहे की, चीनी सैनिकांनी फिंगर 5 वरून फिंगर 8 वर सरकावे. भारताने चीनी सैनिक पूर्णपणे मागे सरकेपर्यंत प्रमुख भागातून मागे सरकण्यास नकार दिला आहे.

थिंक टँकने म्हटले, 2017मध्ये डोकलाम प्रमाणे, ड्रॅगनच्या आक्रमकते विरूद्ध भारतीय राजकीय आणि लष्करी नेतृत्वाकडून दाखवण्यात आलेली दृढता आणि संकल्पाने चीनला हैराण केले आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या एका रिपोर्टचा संदर्भ देत म्हटले आहे की, लष्कर आणि मुत्सुद्दी स्तरावरील चर्चेद्वारे सहमती झाली नसती, वाद मोठ्या कालावधीसाठी राहिला असता. दुसर्‍या शब्दात, खुप कठिण हवामान असताना दोन्ही देश थंडीतही ठाम राहण्यास तयार आहेत.

ईएफएसएएसने म्हटले की, भारताने सियाचिन ग्लेशियरप्रमाणे येथे मोठ्या प्रमाणात सैन्य सामान आणि रसद एकत्र केली आहे. भारताकडून केलेल्या तयारीवरून समजते की, भारत सीमेवर कोणत्याही गंभीर संघर्षाला तोंड देण्यासाठी खुप मजबूत आहे.

ईएफएसएएसनुसार, भारताला अपेक्षा आहे की, सध्याच्या स्थितीत चर्चेतून मार्ग निघावा. परंतु, त्याने आपल्या भागाच्या रक्षणासाठी संभाव्य संघर्षासाठी तयारी करण्यात कसर सोडली नाही. यासाठी, भारत आणि चीनसाठी आपसात चर्चेतून मार्ग काढणे हाच चांगला पर्याय असू शकतो, ज्यामध्ये चीनचा चेहरा सुद्धा अबाधित राहण्याचा रस्ता समावलेला आहे.