भारताला सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी लागू शकतो 6 महिन्यांचा कालावधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचे म्हणणे आहे की, भारत अर्थव्यवस्था, महामारी आणि चक्रीवादळासारख्या अनेक संकटांतून येत्या ६-९ महिन्यात सावरेल. उद्योगपतींचे हे मत लोक, व्यवसाय आणि सरकार यांनी दर्शवलेल्या पध्दतीवर आधारित आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), दिल्ली यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोर येणाऱ्या आव्हानांबाबत व्यवसायिक दिग्गजांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान, जीवन आणि अर्थव्यवस्थेला संकटातून सावरण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

टेक महिंद्रामध्ये कॉर्पोरेट अफेयर्सचे एपीएसी बिझिनेस हेड आणि अध्यक्ष सुजित बक्षी म्हणाले, “कोविड-१९ ने जगाला बिजनेस ट्रांझिशनसाठी डिजिटल प्रॅक्टिससाठी प्रेरित केले आहे. आयटीने अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या संकटाला तात्काळ उत्तर दिले, कारण उद्योग तयार होता आणि डिजिटायझेशनच्या दिशेने काम करत होता.” ते म्हणाले की, आज ९३-९४ टक्के कामगार घरातून काम करत आहेत, याला आम्ही आमच्या उद्योगासाठी संधी आणि काम करण्याच्या पध्दतीत बदल म्हणून पाहत आहोत. आयबीएम इंडिया, दक्षिण आशियाचे व्हाईस प्रेसिडंट प्रतिभा मोहपात्रा यांच्यामते, नेतृत्व, शिस्त, करुणा आणि टीमवर्क अधिक आवश्यक होईल. ते म्हणाले, “दूरसंचार उद्योग सध्याच्या महामारीमध्ये मज्जासंस्था आणि मांस व रक्त म्हणून उदयास आला आहे.”

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) चे महासंचालक राजन मॅथ्यूज म्हणाले की, आव्हानेही दूरसंचार उद्योगाला स्वदेशी महत्वपूर्ण समाधानाला इनोव्हेट करण्याची आणि बनवण्याची संधी देत आहे, जी जागतिक पातळीवर पोहोचू शकते. चिनटेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सोलोमन यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे, जो भारतातील दुसरा सर्वात मोठा नियोक्ता आहे. सीआयआय दिल्लीचे चेअरमन आदित्य बर्लिया म्हणाले, “आम्ही उद्योगाच्या आधारावर अर्थव्यवस्थेत ५ ते १५ टक्क्यांच्या आकुंचनात प्रवेश करत आहोत आणि हे आर्थिक संकट भारतासाठी विचित्र आहे कारण आपण असे काहीही यापूर्वी अनुभवलेले नाही.” बर्लिया म्हणाली, “आमचा विश्वास आहे की या वर्षाच्या पुढील सहा महिन्यांत कोविड-१९ मुळे उत्पन्न होणारी आर्थिक समस्या सुटू लागेल आणि त्यानंतर आपण गोष्टी पुढे जात असल्याचे पाहू.”