India vs England : केएल राहुलच्या खराब फॉर्मबाबत प्रश्न विचारला असता पत्रकार परिषदेत गाणे गाऊ लागला विराट – Video वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडमध्ये तीन मॅचेच्या वनडे इंटरनॅशनल सीरीजची पहिली मॅच 23 मार्चला खेळवली जाणार आहे. मॅचच्या एक दिवस अगोदर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत गाणे गाऊ लागला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेयर केला आहे. केएल राहुलच्या खराब फॉर्मबाबत विराटने एकदम अचूक उत्तर दिले.

केएल राहुलच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारला असता विराटने म्हटले की, फॉर्म आणि आऊट ऑफ फॉर्मबाबत माझ्या मनात एकच गोष्ट येते, ते हेच गाणे आहे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों को, कहीं बीत ना जाए रैना. मला असे वाटते की, लोकांमध्ये संयम नाही. क्रिकेट सेट-अपच्या बाहेर लोकांचे आपआपले पॉईंट ऑफ व्ह्यू असतात, लोकांच्या आपल्या डोक्यात सुरू असते की, प्लेयरच्या डोक्यात काय सुरू आहे, मग ते जजमेंट बनते. लोकांना शौक झाला आहे, रोज टिका ऐकण्याचा. एखादा प्लेयर खाली असेल, तर खुप मजा येते लोकांना, त्याला आणखी खाली पाडण्यात. परंतु टीममध्ये आम्हाला माहित आहे की, लोकांना कसे मॅनेज करायचे आहे.

विराटने पुढे म्हटले, जो खेळाडू व्यक्तीगत पातळीवर अवघड काळातून जात असतो, असे नाही होत की तुम्ही क्रिकेट खेळणे विसरून जाता, बस मेंटली क्लॅरिटी थोडी कमी होते, आणि त्यावेळी जर तुम्हाला समजले की, तुमच्या बाबत काय बोलले जात आहे, तुम्ही आऊट ऑफ फॉर्म आहोत, तर तुमच्यावर आणखी दबाव वाढतो. क्रिकेट सिम्पल गेम आहे, बॉल पहाणे आणि मारणे. आम्ही आमच्या खेळाडूंना बॅक करू आणि प्रयत्न करू की त्यांना एका चांगल्या मेंटल स्पेसमध्ये ठेवले जाईल.