IND vs ENG : दुखापत झाल्याने श्रेयस अय्यर वनडे सीरीजमधून बाहेर; रोहित शर्मा खेळू शकणार नाही पुढचा सामना

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   इंग्लड विरुद्धच्या वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. खांद्याला दुखापत झाल्यामुळे स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला या मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. पहिल्या एकदिवशीय सामन्यात त्याला ही दुखापत झाली. याशिवाय अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा पुढच्या सामन्यात सहभागी नसल्याचे BCCI ने सांगितले आहे. फलंदाजी करताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचा १४८ किमी वेगाचा बॉल रोहित शर्माच्या कोपऱ्यावर आदळला. त्यानंतर त्याला वेदना झाल्या.

BCCI च्या म्हणण्यानुसार जॉनी बेअरस्टोच्या वतीने लावलेल्या शॉटला बाउंड्रीकडे जाण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात अय्यर यांचा डावा खांदा दाबला गेला.

टीमसाठी काही रन वाचविण्यात ते सफल झाले, परंतू काही वेळानंतर त्यांना वेदना होऊ लागल्या आणि त्यांना त्यांचा डावा खांदा पकडून मैदान सोडून जावे लागले. या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारताच्या वनडे सीरिज जिंकण्याच्या आशेला धक्का लागला आहे.

या दोन्ही फलंदाजांनी इंगलंडविरुद्ध T-२० मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पराभवानंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आणि जगातील एक नंबरच्या T-२० टीमला पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ असा प्रभाव केला. मात्र वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि श्रेयस फारसे कामगिरी करू शकले नाहीत.

पहिल्या सामन्यात रोहितने ४२ बॉलमध्ये २८ धावा केल्या, ज्यात ४ चौक्यांचा समावेश आहे. त्यांनी ओपनिंग बॅट्समन शिखर धवन यांच्यासोबत जोरदार सुरवात करत ६४ धावांची भागीदारी केली. रोहितचा डाव इंग्लंडच्या बेन स्टोक्सने संपवला. श्रेयस अय्यरच्या कामगिरीबध्दल बोलताना ते चौथ्या क्रमांकावर खेळायस आले आणि स्वस्तात आउट होऊन पवेलियनला परतले. दोन्ही संघातील दुसरा एकदिवशीय सामना २६ मार्च रोजी खेळला जाईल.