खुशखबर ! भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कप 2021 साठी ‘नामांकित’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  सध्याच्या घडली सर्वत्र कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सध्याच्या काही क्रीडा स्पर्धा रद्दही केल्या गेल्या आहेत. तर काही क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण या सर्व वातावरणात भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

 

विश्वचषक खेळण्यासाठी प्रत्येक संघाची योग्य ती पात्रता असावी लागते. विश्वचषकापूर्वी पात्रता स्पर्धा घेतल्या जातात आणि यामधून विश्वचषकासाठी कोणते संघ पात्र ठरले आहेत, हे ठरवले जाते. सध्याच्या घडीला भारतीय महिला क्रिकेट संघ हा विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2021 मध्ये होणार असून यासाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे. ही स्पर्धा न्यझीलंडमध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च या दरम्यान खेळवण्यात येणार आहे. भारता व्यतिरिक्त चार देश विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये न्यूझिलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. याची माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली आहे.

महिला क्रिकेट विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये होणार आहे. या विश्वचषकात भारताला पात्र ठरण्यासाठी पाकिस्तानशी सामना करावा लागणार होता. पण हा सामना रद्द करण्यात आला आणि भारताला अव्वल चार संघामध्ये स्थान मिळाले. हा सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ आगामी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.