खुशखबर ! मोदी सरकार विकत आहे स्वस्तात सोनं, खरेदी करण्याची शेवटची संधी 9 सप्टेंबरपासून, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चालू आर्थिक वर्षात सोन्यात गुंतवणूक करण्याची सरकारची योजना असलेल्या सॉवरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond) चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील गुंतवणूक येत्या आठवड्यातील सोमवार, ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. चौथ्या टप्प्यात सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी ९ ते १३ सप्टेंबरपर्यंत आहे. सरकारच्या या सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना पाच दिवसांचा कालावधी आहे. गेल्या आठवड्यात १० ग्रॅम सोन्याची किंमत ४०,००० रुपयांच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत सरकार तुम्हाला सॉवरेन गोल्ड बाँडच्या माध्यमातून बाजारभावापेक्षा स्वस्त किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी देत आहे.

स्वस्तात सोने खरेदी करू शकता
५ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर सोन्याच्या किंमतीत सतत वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती ४०,००० रुपयांना भिडल्या. तथापि, सरकार तुम्हाला स्वस्तपणे सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. आपण रिझर्व्ह बॅंकेच्या सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेंतर्गत स्वस्तपणे सोने खरेदी करू शकता.

सोने ‘इतके’ स्वस्त घेता येईल
२ ऑगस्टपर्यंत, शुक्रवारी सोन्याचा बाजारभाव प्रति ग्रॅम ३,९६६ रुपये होता. मात्र या योजनेंतर्गत तुम्ही प्रति ग्रॅम ३,४९९ रुपयांत सोने खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त डिजिटल मोडमधून देय दिल्यास प्रति ग्रॅम ५० रुपये सूट देण्यात येणार आहे. म्हणजेच सोव्हरेन गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करणार्‍या ग्राहकांसाठी एका ग्रॅम सोन्याची किंमत ३४४९ रुपये असेल. म्हणजेच तुम्ही सोन्याच्या बाजारातल्या किंमतीपेक्षा ४६७ रुपये प्रति ग्रॅम दराने गुंतवणूक कराल.

हा आहे नियम
सॉवरेन गोल्ड बाँड योजनांमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ५०० ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. एक ग्रॅम किमान गुंतवणूक आहे. आपण या योजनेत गुंतवणूक करून करदेखील वाचवू शकता.

रोखे आणण्यामागील कारणे
सोन्याची भौतिक मागणी कमी करणे हे सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचे उद्दीष्ट आहे. या अंतर्गत सोने खरेदी केले जात नाही किंवा घरात देखील ठेवले जात नाही परंतु बाँड्समध्ये गुंतवणूक म्हणून वापरले जाते.

आपण येथून खरेदी करू शकता
हे बाँड बँक, पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसई याशिवाय स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत खरेदी करता येतील. हे रोखे बँकांकडून ऑनलाईनही खरेदी करता येतील. यानंतर बाँड खरेदीचा तिसरा टप्पा ५ ऑगस्टला उघडला होता तर चौथा टप्पा आता ९ सप्टेंबरला उघडेल.

आरोग्यविषयक वृत्त –