IPL 2020 : CSK चे मालक श्रीनिवासन सुरेश रैनावर भडकले, म्हणाले – ‘लवकरच समजेल काय गमावलं, विशेष करून पैशांमध्ये’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची फ्रेंचाईजी टीम चेन्नई सुपर किंग साठी शुक्रवारपासून एकामागून एक अडचणी सुरु आहेत. शुक्रवारी टीम मधील एक गोलंदाज आणि स्टाफ मधील काही मेम्बर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर शनिवारी सुरेश रैना वैयक्तिक कारण सांगत भारतात परतला. त्यानंतर सीएसके मधील आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. रैना भारतात परतल्यामुळे सीएसकेचे मालक आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन खूप भडकले होते. श्रीनिवासन म्हणाले, रैना जेव्हा दुबईला पोहचला तेव्हा त्याच्या विविध कारणांवरून अनेक तक्रारी होत्या. मग हॉटेल रूम वरून नाराज होता का रैना?

सीएसकेचा उप कर्णधार सुरेश रैनाच्या आयपीएल मधून बाहेर पडण्याचा निर्णयाने सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. सुरुवातीला समजलं की रैनाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या कारणामुळे रैना भारतात परतला. नंतर रैनाने सांगितले की, त्याच्या साठी त्याच्या मुलांची सुरक्षा महत्वाची आहे, आणि सीएसके मध्ये असं अचानक कोरोना संक्रमण वाढत आहे त्यामुळे तो थोडासा घाबरला आणि भारतात परत आला. श्रीनिवासन यांनी आऊट लूकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, रैनाच्या अशा तडकाफडकी जाण्याने सगळेजण परेशान आहेत पण ‘परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे असा धोनीने मला विश्वास दिला आहे’ असंही ते म्हणाले.

श्रीनिवासन म्हणाले, ‘क्रिकेटर्स स्वतःला खूप भारी समजत आहेत, जसं आधीच्या जमान्यात नखरे करणारे ऍक्टर्स होते. सीएसके नेहमी एका परिवारसारखं आहे आणि सिनियर खेळाडू इथं मिळून मिसळून राहतात. जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी परत जावं मी कोणाला जबरदस्ती करत नाही. कधी कधी तुम्ही केलेली कामगिरी तुमच्या डोक्यात जाते.’ धोनीने विश्वास दिला की, कोरोना पॉझिटिव्ह आलेले खेळाडू लवकरच रिकव्हर होऊन परत खेळायला तयार असतील. श्रीनिवासन रैनाला म्हणाले, लवकरच समजेल की त्याने काय गमावलं, खास करून पैशांच्या बाबतीत.

रैनाला होणार 11 कोटींचं नुकसान

ते म्हणाले, ‘मी धोनीशी बोललो आणि त्याने मला विश्वास दिला की जे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत ते लवकर बरे होऊन येतील, त्यामुळे परेशान होण्याची गरज नाही. त्यांनी झूम कॉल वरून खेळाडूंशी बातचीत केली आणि त्यांना काळजी घेण्यास सांगितले.’ ते पुढे म्हणाले, ‘आत्ता तर सिजन सुरुही झालं नाही आणि रैनाला समजेल की त्याने काय गमावलं आहे.’