कपिल शर्मा लवकरच होणार ‘बाप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवणारा द कपिल शर्मा शोमधील कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच बाप होणार अशी माहिती समोर आली आहे. कपिल आणि पत्नी गिन्नी चतरथ यांच्या घरी लवकरच एका तान्हुल्याचे आगमन होणार आहे. रिपोर्टनुसार, कपिलच्या घरी आता बाळाचे आगमन होणार असल्याने कपिल शर्माने शोची शुटींग अशा प्रकारे नियोजित केली आहे की, कपिल आपली पत्नी गिन्नी चतरथला पूर्ण वेळ देऊ शकेन, तिची काळजी घेऊ शकेन.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ ही प्रेग्नंट आहे. कपिलच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. जेव्हापासून कपिलला ही आनंदाची बातमी कळाली आहे कपिल खूपच खुश असून पत्नी गिन्नीची तो विशेष काळजी घेताना दिसत आहे. अशी माहिती समोर आली आहे की, गिन्नी आता बहुत करून कपिलच्या सोबतच असते. ती अनेकदा शुटींगवेळीही कपिलसोबत असते. जेव्हा गिन्नी शुटींगच्या ठिकाणी हजर असते तेव्हा फक्त कपिलच नाही तर शोची पूर्ण टीमच गिन्नीची काळजी घेताना दिसत असतात.

कपिल आपल्या पत्नीची विशेष काळजी घेताना दिसत आहे. त्याचे गिन्नीवर किती प्रेम आहे हे तो घेत असलेल्या काळजीतूनही प्रतीत होताना दिसत आहे. शिवाय अनेकदा दोघांची छान केमिस्ट्रीही दिसत आहे. गिन्नीही कपिलवर भरभरून प्रेम करताना दिसत असते. दोघेही या आनंदाच्या बातमीमुळे खूपच खुश असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

🙏

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like