ITBP Recruitment 2020: आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबलसह अनेक पदांवर भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी कॉन्स्टेबल जीडी (सामान्य ड्यूटी) च्या अनेक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती स्पोर्ट्स कोटा उमेदवारांसाठी असून यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या ५१ आहे. ही भरती सुरूवातीस तात्पुरती असेल आणि नंतर कायमस्वरूपी केली जाऊ शकते. आयटीबीपी कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज १३ जुलैपासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार आयटीबीपीच्या recruitment.itbppolice.nic.in वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्षात असू द्या की, अर्ज करण्यापूर्वी आपण संपूर्ण भरती सूचना वाचणे आवश्यक आहे.

आयटीबीपी कॉन्स्टेबल जीडी भरतीची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख- १३ जुलै २०२०
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- २६ ऑगस्ट २०२०

कॉन्स्टेबल (सामान्य ड्युटी)- ५१ पदे
कुस्ती (महिला)
बॉक्सिंग (पुरुष आणि महिला)
तिरंदाजी (पुरुष आणि महिला)
कबड्डी (पुरुष)
क्रीडा शूटिंग (पुरुष आणि महिला)
व्हॉलीबॉल (पुरुष)
आइस हॉकी (पुरुष)

वयोमर्यादा- १८ ते २३ वर्ष

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

क्रीडा पात्रता
अर्जदाराने कोणत्याही संबंधित खेळामध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले असावे.

वेतनमान
आयटीबीपी जीडी कॉन्स्टेबलचा पगार- पे मॅट्रिक्स ३ नुसार, २१,७००-६९,१०० रुपये (सातव्या वेतन आयोगानुसार)

अर्ज शुल्क
सर्वसाधारण आणि ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी १०० रुपये. इतर राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज फी नाही.