LoC वर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ‘नापाक’ कृत्य ! शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन, 3 जवान शहीद तर 5 जखमी

जम्मू काश्मीर ( jammu kashmir) मध्ये गुरुवारी पुन्हा एकदा पाकिस्तानची नापाक हरकत समोर आली. दोन वेगळ्या सीजफायरमध्ये (शस्त्रसंधीचं उल्लंघन) भारताचे 3 जवान शहिद झाले आहेत. तर 5 इतर सैनिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीर ( jammu kashmir) च्या नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारताकडून कोणत्याही प्रकारे उकसवलं नसतानाही सीजफायर उल्लंघन केलं.

यात 2 जवान शहिद झाले आणि 4 जवान जखमी झाले होते. या आधी पाकिस्ताननं पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील अग्निम भागात गोळीबार केला आणि तोफ डागून युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं. यात भारताचा एक जवान शहिद आणि इतर एक जवान जखमी झाला.

पुंछ जिल्ह्यातील सीजफायर उल्लंघन बद्दल माहिती देताना एका संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं की, पाकिस्तानी सैन्यानं मनकोट आणि कृष्णा घाटी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळल लहान हत्यारांनी गोळीबार करत आणि तोफ डागत कोणत्याही प्रकारे उकसवलं नसतानाही युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं. त्यांनी सांगितलं की, भारतीय सैन्यानंही याचं जोरदार प्रत्त्युत्तर दिलं. प्रवक्त्यानं सांगितलं की, सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात लांस नायक करनैल सिंह शहिद झाले.