Jio युजर्सला बसणार मोठा ‘धक्का’, कंपनीनं केली ‘ही’ घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वस्त डेटा आणि कॉलची सुविधा संपणार लवकरच आहे. रिलायन्स जिओही येत्या काही आठवड्यांत मोबाइल दर वाढवू शकते. कंपनीने मंगळवारी याबाबत घोषणा केली. यापूर्वी सोमवारी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने 1 डिसेंबरपासून दर वाढवण्याची घोषणा केली आहे .

जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम रेग्युलेटरच्या (ट्राय) निर्णयाच्या आधारे दरवाढीचा निर्णय घेण्यात येईल. ट्रायने दूरसंचार उद्योगाकडे दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास निर्णय अंमलात आणला जाईल. दर वाढल्याने डेटाच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.

यापूर्वी एक दिवस आधी व्होडाफोन आयडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ते येत्या 1 डिसेंबरपासून ते मोबाइल सेवांचे दर वाढवतील. दर वाढवण्याचे कारण कंपनीने आर्थिक संकट असल्याचे सांगितले आहे.  मात्र दरात किती वाढ करण्यात येईल हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही. डिसेंबरपासून एअरटेलनेही आपल्या सेवांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

ग्राहकांची संख्या

37.24 कोटी -व्होडाफोन-आयडिया
35.52 कोटी – जिओ
32.55 कोटी – एअरटेल

ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने एकूण 49 लाख ग्राहक गमावले. एअरटेलने 23.8 लाख ग्राहक गमावले तर व्होडाफोन-आयडियाने 25.7 लाख ग्राहक गमावले.त्याच वेळी रिलायन्स जिओने या कालावधीत 69.83 लाख नवीन युजर्स जोडले.

ट्रायच्या म्हणण्यानुसार, जून 2016 ते डिसेंबर 2017 या काळात देशातील मोबाइल डेटा दरात 95 टक्क्यांनी घट झाली आहे. मोबाइल डेटा आता प्रति गीगाबाईट (जीबी) च्या सरासरी 11.78 च्या किंमतीवर उपलब्ध आहे. मोबाइल कॉलचे दरही 60 टक्क्यांनी घसरले असून ते प्रति मिनिट 19 पैशांच्या आसपास गेले आहेत.

Visit :  Policenama.com