‘दबंग’ सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपबाबत बॉलिवूडच्या ‘कॅट’चा मोठा खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि सलमान खान नुकतेच चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे दोघांमधील रिलेशनशिप. सलमान खान नेहमीच कॅटच्या सपोर्टसाठी पुढे येत असतो. नुकतंच कॅटरीनाने सलमान खान आणि तिच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे. दोघांमध्ये नेमकं काय नातं आहे हे सांगितलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना कॅटरीना म्हणाली की, “सलमान आणि माझ्यात एक चांगली मैत्री आहे. याशिवाय आमच्यात कोणतंही नातं नाही. मी आणि सलमान गेल्या 16 वर्षांपासून मित्र आहोत. समलान एक चांगला माणूस आहे आणि माझा चांगला मित्रही आहे. तो नेहमीच माझ्यासाठी पुढे येत असतो. जेव्हा मला गरज होती तो माझ्यासाठी हजर होता. तो नेहमी जरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नसला तरी जेव्हा मी त्याला मदत मागितली आहे त्याने माझी मदत केली आहे.”

https://www.instagram.com/p/B2pLz-jn6ub/?utm_source=ig_embed

नुकताच सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात समलान खान कॅटरीनासाठी चिअर करताना दिसून आला. सादरीकरण करण्यासाठी आयुष्मानने जसं कॅटचं नाव घोषित केलं तिला चिअर करण्यासाठी सलमान खान आपल्या जागेवरून उठला आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी चिअर करू लागला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या सलमान दबंग 3 च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. कॅटरीना सूर्यवंशी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कॅटरीनासोबत अक्षय कुमार लीड रोलमध्ये असणार आहे.

Visit – policenama.com