सोन्याच्या तस्करीप्रकरणी महिलेविरूद्ध UPA अंतर्गत गुन्हा दाखल, NIA नं कोर्टाला सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासातील माजी महिला कर्मचारी आणि मुत्सद्दी मालमार्फत सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रमुख संशयिताविरूद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) केरळ उच्च न्यायालयात ही माहिती दिली. फरार असलेल्या स्वप्ना सुरेशच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाविरूद्ध दावा करताना, केंद्र व राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) वकील म्हणाले की, तिची गुन्हेगारी नोंद आहे आणि सोन्याच्या तस्करीसाठी मुत्सद्दी कागदपत्रांची व्यवस्था करण्यात तिचा सहभाग होता. जी नुकतीच सीमाशुल्कांनी जप्त केली आहे.

एनआयएच्या वकिलाने सांगितले की, महिलेच्या भूमिकेचा तपास लावण्यासाठी तिला कस्टडीत घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तस्करीच्या प्रयत्नांची चौकशी करण्यास एनआयएला गुरुवारी केंद्राने सांगितले होते. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अशोक मेनन यांनी अर्जावरील सुनावणी पुढील मंगळवारपर्यंत तहकूब केली. न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याची विनंती नाकारली ज्यामध्ये त्यांनी अटकेविरूद्ध अंतरिम संरक्षण मागितले.