मोठा निर्णय ! भारतातील ‘या’ राज्यामध्ये थेट 1 वर्षासाठी ‘कोरोना’ संदर्भात गाईडलाइन्स, मास्क न घातल्यास 10 हजार ‘दंड’

तिरुवनंतपुरम : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलत केरळ सरकारने पुढील एक वर्षासाठी कोविड-19 गाईडलाइन्स अनिवार्य केल्या आहेत. राज्य सरकारने राज्य आपत्ती महामारी कायदा (स्टेट एपिडेमिक डिसीज ऑर्डिनन्स) दुरूस्त केला आहे, जो जुलै 2021 पर्यंत प्रभावी राहिल.

या गाईडलाइन्स केरळ एपेडेमिक डिसीज कोरोना व्हायरस डिसीज (कोविड-19) अ‍ॅडिशनल रेग्युलेशन, 2020 अंतर्गत जारी केल्या आहेत. केरळ पहिले राज्य आहे, जेथे देशात सर्वप्रथम कोविड-19 चे प्रकरण सापडले होते.

या आहेत नवी गाईडलाइन्स-

1 – सार्वजनिक ठिकाणांवर सर्वांनी मास्क घालावा किंवा आपला चेहरा झाकून घ्यावा. कामाच्या ठिकाणीसुद्धा मास्क घालणे अनिवार्य आहे.

2 – कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्व लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

3 – सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 10 हजार रुपये दंड करण्यात येईल.

4 – केरळमध्ये विवाह सोहळ्यात कमाल 50 लोक सहभागी होण्याची परवानगी आहे.

5 – अंत्यसंस्कारात कमाल 20 लोक सहभागी होऊ शकतात.

6 – सामाजिक गर्दीसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे.

7 – सार्वजनिक स्थळांवर थूंकण्यावर कडक प्रतिबंध असेल.

8 – अन्य राज्यांतून केरळात येणार्‍या लोकांना केरळ सरकारच्या जगराथा ई-प्लॅटफॉर्म वर स्वत:ला रजिस्टर करावे लागेल. मात्र, अंतरराज्यीय प्रवासासाठी पासची गरज असणार नाही.

9 – कोणत्याही दुकानात सोशल डिस्टन्सिंग मेंटन करत कमाल 20 लोकांना परवानगी असेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like