खतरों के खिलाडी : रोहित शेट्टीनं फोडला तेजस्वीचा फोन, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – खतरों के खिलाडी 10 ला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली आहे. प्रेक्षक खूपच एक्साईटेड झाले आहेत. रोहित शेट्टी अनेक वेगवेगळे टास्क घेऊन येताना दिसत आहे. अलीकडेच असं काही झालं की रोहित शेट्टीला अ‍ॅक्ट्रेस तेजस्वीचा फोन फोडावा लागला.

https://www.instagram.com/p/B9Lj5A8BI8i/

एका टास्कमध्ये तेजस्वीला आपल्या फोनचा बळी द्यावा लागला. एका टास्कमध्ये रोहितनं स्पर्धकांना 3 मोबाईल फोन दिले जे लॉक होते. स्पर्धकांना फोन अनलॉक करायचा होता. याचे पासवर्ड वेगवेगळ्या कंटेनरमध्ये होते. परंतु त्या कंटेनरमध्ये अनेक किडे होते. परंतु यातही एक ट्विस्ट होतं. जर कोणी फोन अनलॉक करू शकलं नाही तर त्याचा फोन फोडला जाईल.

https://www.instagram.com/p/B9LgaxZBPCl/

तेजस्वी, मलिष्का आणि अमृता खानविलकर या हे टास्क करणार होते. मलिष्का हे टास्क जिंकली. तेजस्वी आणि अमृता यांना हे टास्क जमलं नाही. दोघींचा फोन फोडण्यात आला. अमृतानं यावर जास्त काही रिअ‍ॅक्ट नाही केलं. परंतु यामुळे खूप हार्ट झाली. तिनं अनेकदा म्हटलं की, रोहितसोबत बोलणार नाही.

https://www.instagram.com/p/B88Na9IhEOF/

सध्या चाहत्यांनाही हा शो आवडत आहे. यातील वेगवेगळे टास्क पाहताना कधी चाहत्यांच्याही अंगावर काटा येतो. यावेळी अनेक खतरनाक स्टंट पहायला मिळत आहे.