गायक किशोर कुमार यांच्या पत्नीला कपिल शर्माने विचारला असा प्रश्न की, लींना चंदावरकर लाजल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कपिल शर्मा त्याचा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ द्वारे प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असतो. या शोमध्ये नकुतेच बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध खलनायक रंजीत, गुलशन ग्रोवर आणि किरण कुमार आले होते. यावेळी या खलनायकांनी त्यांच्या फिल्मी करिअरमधील अनेक बाबींचा खुलासा केला आहे. याशिवाय या शोमध्ये प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची पत्नी लीना चंदावरकर, त्यांची मुले अमित आणि सुमित कुमार हे देखील आले होते. यावेळी अमित कुमार यांनीही अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात अनेक रोचक किस्से समोर येताना दिसले.

यावेळी या शोमध्ये किशोर कुमार यांची पत्नी लीना चंदावरकर यांना कपिलने प्रश्न विचारला की, तुम्ही तर खूपच सुंदर आहात, जेवढ्या तुम्ही सुंदर आहात तेवढेच किशोर दा खोडकर होते. मग ते तुमच्या नादात एवढे सिरियस कसे झाले ? हा प्रश्न ऐकताच त्या हसताना दिसल्या. याशिवाय पुत्र अमित कुमार यांनीही आपले पिता किशोर कुमार यांची अनके सपुरहिट गाणी यावेळी गायली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय या शोमध्ये कपिल व्यतिरीक्त बाकीचे कॉमेडी कलाकार कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर यांनी आपले सादरीकरण करत सर्वांचे मनोरंजन केले.

सुमित कुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक प्लेबॅक सिंगर आहेत. अनेक सिनेमातील गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. यात हिंमतवाला, माय नेम इज अँथनी, धमाल, ट्राफिक सिग्नल, अपना सपना मनी मनी याशिवाय अनेक सिनेमांचा समावेश आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like