‘लॉकडाऊन’मध्ये ‘या’ 4 गोष्टींना खूप मिस करतेय कृती सेनन ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात लॉकडाऊन लागू होऊन 2 महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत. अनेकजण आता लॉकडाऊन संपण्याची वाट पहात आहेत. बॉलिवूड स्टार कृती सेनन कोणत्या चार गोष्टी मिस करत आहे याचा तिनं खुलासा केला आहे.

कृतीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. कृती म्हणते, “हॅलो दोस्तांनो. खूप दिवस झाले आपण घरातच आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे की, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी मिस करत आहे. परफॉर्म करणं, शुटींग करणं, कॅमेऱ्या समोरच्या त्या गोष्टी आणि सेट मिस करत आहे.”

कृती पुढे म्हणते, “मी दोस्तांसोबत चिल करणं, थिएटरमध्ये जाऊन मुव्ही पाहणं आणि तिसरी गोष्ट जी मी जास्त मिस करत आहे ती आहे जीम वर्कआऊट. मला वाटतं की लवकरात लवकर जीम सुरू व्हाव्यात. चौथी गोष्टी आहे ती म्हणजे होम सलून सर्व्हीस जी मी मिस करत आहे.”

कृतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like