मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासह गुजरातमध्ये 2-3 दिवस अतिवृष्टीचा IMD अंदाज, जाणून घ्या ‘या’ 12 राज्यांबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुढील २-३ दिवसांत बर्‍याच भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने गुरुवारी ही माहिती दिली. विभागाने सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वारा आणि अरबी समुद्राच्या ओलावामुळे दक्षिणपूर्व वारे पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशातील बर्‍याच भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विभागाने म्हटले की, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या पश्चिम भागातील गुजरात, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि भारताच्या मध्य भागांतही पुढील ४-५ दिवसांत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विभागाने म्हटले की, गुजरातमध्ये पुढील २ दिवसांत आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात पुढील २४ तासांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने सांगितले की, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या किनारपट्टी भागातही पुढील २-३ दिवसात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.