रणवीर सिंगचा अवतार पाहून घाबरली लहान मुलगी (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर रणवीर सिंग आपल्या अ‍ॅक्टींग व्यतिरीक्त वेगवेगळ्या लुकमुळेही चर्चेत असतो. आपल्या फॅशनला स्टायलिश आणि डिफरेंट बनवण्यासाठी तो नेहमीच काही ना काही प्रयोग करत असतो. अशातच सोशल मीडियावरून रणवीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो कूल दिसण्यासाठी विचित्र हरकती करताना दिसत आहे.

एका डबिंग स्टुडिओबाहेरचा हा व्हिडीओ आहे. यात रणवीरने लाँग रेड हुडी घातली आहे. स्टुडिओतून बाहेर पडताच चाहते रणवीरभोवती गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी आपल्या कारमध्ये जाताना एक लहान मुलगी रणवीरला पाहून घाबरल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

एक वडिल आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन उभे होते. रणवीर जसा त्या मुलीच्या दिशेने सरसावला ती एकदम घाबरली. रणवीरने तिला कडेवर घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती घाबरून रडू लागली. सध्या रणवीरचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या तो 83 या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. नुकती लंडनला शुटींग करून तो परतला आहे. 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. यात रणवीर लेजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका यांचा हा पहिला सिनेमा आहे. 10 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com