मतदानादरम्यान बॉम्ब हल्ला ; ३ जण जखमी

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे क्रुड बॉम्ब फेकण्यात आला. तो लागून तृणमुल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. मुर्शिदाबादमधील दोमकल महापालिका क्षेत्रात ही घटना घडली.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. मुरादाबाद येथे लोकसभेसाठी आज मतदान होत आहे. तेथील २३१ मतदान केंद्रावरील निवडणुक अधिकारी हे समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल ला मतदान करायला सांगत असल्याचा आरोप करुन ही मारहाण करण्यात आली.

भाजपचे कार्यकर्ते या निवडणुक अधिकाऱ्याकडे विचारणा करीत असताना दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या अधिकाऱ्याला त्यांच्या तावडीतून सोडविले.