माहिरा शर्मानं कबूल केलं, ‘Fake होतं दादासाहेब फाळके अवॉर्ड सर्टीफिकेट’, सोबतच केला ‘हा’ मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 ची स्पर्धक माहिरा शर्मा गेल्या काही दिवसांपासून दादासाहेब फाळके पुरस्काराचं बनावट सर्टीफिकेट बनवण्याला घेऊन चर्चेत आहे. तिचं हे सर्टीफिकेट बनावट असल्याचा आरोप होत आहे. अशात आता माहिरा शर्मानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिचं हे सर्टीफिकेट बनावट असल्याचं तिनं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B8_koJ7l2y3/?utm_source=ig_embed

माहिरानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये माहिरा म्हणते, “यात काही शंका नाही की मला देण्यात आलेलं सर्टीफिकेट फेक आहे जसं की दादासाहेब फाळके इंटरनॅनशनल फिल्म फेस्टीवलनं सांगितलं आहे. जेव्हा मला हे सर्टीफिकेट देण्यात आलं तेव्हा मला याबाबत माहिती नव्हतं. तुम्ही सांगितलं तेव्हा मी ती पोस्ट डिलीट केली. मला जर आधीच माहिती असतं की, ते सर्टीफिकेट फेक आहे तर मी कधीच शेअर केलं नसतं.”

पोस्टमध्ये पुढे बोलताना माहिरा म्हणते, “ज्यांनी मला हे सर्टीफिकेट दिलं होतं त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे. हे सगळं चुकीच्या सिचुएशनमुळं झालं आहे. त्यामुळं या प्रकरणी मला दोष देऊ नका. यासाठी मी का माफी मागू?”

माहिरा पुढे म्हणते, “माझी चूक ही आहे की मी हे तपासून नाही पाहिलं की, माझ्यासोबत हे असं काही होत आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं की, फ्युचरमध्ये मला हा अवॉर्ड मिळावा.”

दादासाहेब फाळके पुरस्कार टीमनं माहिरा शर्माबद्दल बोलताना आधीच स्पष्ट सांगितलं होतं की, “टीम मेंबरनं माहिराला कोणतंही सर्टीफिकेट दिलेलं नाही. तिनं बनावट सर्टीफिकेट दाखवत चाहत्यांची दिशाभूल केली आहे. माहिराच्या या कृत्याबद्दल लवकरच तिला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. तिला जाहीर माफी मागण्यासाठीही सांगितलं जाईल. तिला दोन दिवसांचा वेळ दिला जाईल की, तिनं आपली चूक कबुल करावी आणि जाहीर माफी मागावी.”

यानंतर आता माहिरा माफी मागण्यास तयार नाही असं दिसत आहे. तिनं चूक केलीच नाही तर माफी का मागावी असं तिचं म्हणणं आहे.