स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना मलायका अरोराने बिकिनीमध्ये केला कहर , फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमध्ये बिकिनी परिधान केलेला स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. तिच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडत आहे, जो क्षण ती एन्जॉय करत आहे. मलायकाचा हा फोटो अर्जुन कपूरने क्लिक केल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे. अर्जुन कपूरसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर मलायकाने आपल्या बिकिनी फोटोने इंटरनेटवर टेम्परेचर वाढवले आहे. फोटो शेयर तिने लिहिले की, “हसा, आनंदी रहा आणि यावर्षी सर्वकाही काउंट करा, वर्ष 2021 आनंदी बनवा, हॅप्पी संडे. ”

https://www.instagram.com/malaikaaroraofficial/?utm_source=ig_embed

मलायकाचा बिकिनी फोटो पाहून चाहते तिच्या पर्सनॅलिटीचे कौतुक करीत आहेत. त्याचबरोबर फोटोमध्ये अनेकजण अर्जुन कपूरला मिस करत आहेत. यापूर्वी अर्जुन कपूरने मलायकाची बहीण अमृता अरोराच्या गोव्यातील घराचे काही फोटो शेअर केले होते. त्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला एखादी जागा सोडण्याचे मन होत नाही. अमृता आणि शकील तुम्ही काय घर बांधले आहे? गोव्यात दुसरे कोणते चांगले हॉलिडे होम नाही. ” अमृता आणि शकील यांनी आपल्या घराचे नाव ‘ अजारा बीच हाऊस’ ठेवले आहे.

एका फोटोत अर्जुन कपूर खोलीच्या मध्ये उभा असलेला दिसत आहे, ज्यात बर्‍याच लोकांना बसण्यासाठी जागा आहे. याखेरीज दोन्ही बाजूंनी लाकडी सुंदर पायर्‍या आहेत. याशिवाय मलायका अरोरा आणि अमृता अरोरा घराबाहेरच्या एका सुंदर स्विमिंग पूलमध्ये दिसतात. या पुलचे फोटो सामायिक करताना मलायकाने लिहिले की, ‘मला अजारा बीच हाऊस आवडतो’.